अकरावी विज्ञान शाखेत विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा, अन्यथा अभाविपच्या आंदोलनाला तयार राहा
धरणगाव प्रतिनिधी,
धरणगाव येथील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश प्रक्रिया बंद करण्यात आली आहे. तुकडी वाढवण्यासाठी प्राचार्यांना निवेदन देण्यात आले. तालुक्यात एकच शासकीय महाविद्यालय असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा, अन्यथा आंदोलनाला तयार राहा असा इशारा शहर मंत्री इच्छेश काबरा यांनी दिला आहे.
धरणगाव महाविद्यालयात इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत च्या आधारे प्रवेश देण्यात आला. परंतु कोरोना काळात परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांना पास करण्यात आले. दर वर्षाच्या तुलनेने या वर्षी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांना देखील प्रवेश देण्यात यावा. पालक आणि विद्यार्थी अस्वस्थ आहेत. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार गांभीर्याने करावा अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद धरणगाव तर्फे करण्यात आली.
यावेळी अभाविप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. मोठ्या संख्येने विद्यार्थी व कार्यकर्ते उपस्थित होते.