रुग्णसंख्येत किंचित वाढ; राज्यात 3 हजार 608 नवे रुग्ण, 48 मृत्यू

मुंबई,

राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. रोज तीन ते चार हजाराच्या दरम्यान नवे रुग्ण आढळून येत आहेत. सोमवारी 2 हजार 583, काल मंगळवारी 3 हजार 131 रुग्ण आढळून आले होते. आज 22 सप्टेंबरला त्यात किंचित वाढ होऊन 3 हजार 608 रुग्ण आढळून आले आहेत. आज 48 मृत्यूंची नोंद झाली असून 4 हजार 285 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यात 39 हजार 984 सक्रिय रुग्ण –

राज्यात आज दिवसभरात 4 हजार 285 रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे कोरोनामुक्त होणार्‍यांची संख्या 63 लाख 49 हजार 029 झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.21 टक्के एवढे झाले आहे. राज्यात 3 हजार 608 नवीन रुग्णांचे निदान झाले असून 48 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण 1 लाख 38 हजार 664 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 74 लाख 76 हजार 142 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 31 हजार 237 (11.36 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 64 हजार 416 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात सध्या 39 हजार 984 सक्रिय रुग्ण आहेत.

रुग्णसंख्येत चढउतार –

26 ऑॅगस्टला 5 हजार 108, 6 सप्टेंबरला 3 हजार 626, 7 सप्टेंबरला 3 हजार 988, 8 सप्टेंबरला 4 हजार 174, 9 सप्टेंबरला 4 हजार 219, 10 सप्टेंबरला 4 हजार 154, 11 सप्टेंबरला 3 हजार 075, 12 सप्टेंबरला 3 हजार 623, 13 सप्टेंबरला 2 हजार 740, 14 सप्टेंबरला 3 हजार 530, 15 सप्टेंबरला 3 हजार 783, 16 नोव्हेंबरला 3 हजार 595, 17 सप्टेंबरला 3 हजार 586, 18 सप्टेंबरला 3 हजार 391, 19 सप्टेंबरला 3 हजार 413, 20 सप्टेंबरला 2 हजार 583, 21 सप्टेंबरला 3 हजार 131, 22 सप्टेंबरला 3 हजार 608 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

मृत्यू दर 2.12 टक्के –

19 जुलैला 66, 28 जुलैला 286, 2 सप्टेंबरला 55, 3 सप्टेंबरला 92, 4 सप्टेंबरला 64, 5 सप्टेंबरला 67, 6 सप्टेंबरला 37, 7 सप्टेंबरला 86, 8 सप्टेंबरला 65, 9 सप्टेंबरला 55, 10 सप्टेंबरला 44, 11 सप्टेंबरला 35, 12 सप्टेंबरला 46, 13 सप्टेंबरला 27, 14 सप्टेंबरला 52, 15 सप्टेंबरला, 16 नोव्हेंबरला 45, 17 सप्टेंबरला 67, 18 सप्टेंबरला 80, 19 सप्टेंबरला 49, 20 सप्टेंबरला 28, 21 सप्टेंबरला 70, 22 सप्टेंबरला 48 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात 2.12 टक्के इतका मृत्यू दर नोंदवण्यात आला आहे.

या विभागात सर्वाधिक रुग्ण

मुंबई – 486

अहमदनगर – 763

पुणे – 428

पुणे पालिका – 182

पिपरी चिंचवड पालिका – 160

सोलापूर – 241

सातारा – 233

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!