टी20 वर्ल्डकप आधी ऑॅलराऊंडर खेळाडू जखमी, या टीमला मोठा धक्का
दुबई
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामना सुरू आहे. कोरोनामुळे स्थगित झालेले सामने पुन्हा एकदा णअएमध्ये रंगत आहेत. दुसर्या टप्प्यातही मैदानात दुखापती होण्याचं प्रमाण वाढताना दिसत आहे. आज सुरू असलेल्या सामन्यात ऑॅलराऊंडर प्लेअर जखमी झाल्याने मोठा धक्का बसला आहे. याची दोन कारण आहेत. एकतर नुसताच आयपीएलचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. तर दुसरीकडे ढ 20 थेीश्रव र्लीि देखील तोंडावर आलं आहे.
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा ऑॅस्ट्रेलियन ऑॅलराउंडर खेळाडू मार्कस स्टोइनिसला दुखापत झाली आहे. दिल्ली संघाने याची टवीट करून माहिती देखील दिली. नवव्या ओव्हरच्या दुसर्या बॉल दरम्यान त्याच्या पायामध्ये दुखापत झाली. त्याच्या पायाला त्रास होऊ लागला. त्याच्या पायाला दुखापत झाली आहे.
फीजियो पॅट्रिक फारहार्ट यांनी स्टोइनिसचा पाय पाहिला. त्याला तातडीनं मैदानाबाहेर नेण्यात आलं. त्याची ओव्हर अर्धवट राहिली. मात्र त्यानंतर रविचंद्र अश्विन बॉलिंगसाठी आला. मार्कसच्या पायाला झालेली ही दुखापत दिल्ली कॅपिटल्सचं टेन्शन वाढवणार का? ढ 20 वर्ल्ड कप आधी झालेल्या या दुखापतीचा फटका ऑॅस्ट्रेलिया संघाला बसणार का हे आता पाहावं लागणार आहे.