माझे आरोग्य माझी जबाबदारी, डेंग्यू मलेरिया उपक्रम निर्मूलन निंभोरा बु.
निंभोरा बु. [प्रमोद कोंडे]
निंभोरा बु. तालुका रावेर येथे जळगांव जिल्ह्यात डेंग्यू , मलेरियाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर उपाय योजना म्हणून निंभोरा गावात शनिमंदिर व मारोती मंदिर ,भारंबे वाडा, खाचणे वाडा, फवारा चौक परिसरात डेंगू मलेरिया निर्मूलना करीता Lamdo cyhalothrin डास नाशक, Systemic hirbicide तण नाशक ही औषधे परिसरातील तरूणांनी फवारणीं डॉ.एस.डी. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली दि,22/09/2021. बुधवार रोजी सकाळी केली. या माझे आरोग्य माझी जबाबदारी डेंग्यू मलेरिया उपक्रम निर्मूलन उपक्रमा मध्ये सहभागी होऊन धिरज भंगाळे,संदीप भिरुड, चेतन बोरनारे,, चेतन भंगाळे,ऋषिकेश चौधरी ,अक्षय सरोदे,पार्थ भंगाळे ,पंकज पवार,आकाश महाजन, किशोर बोरोले यांनी पंपाच्या द्वारे गावात फवारणी केली,