अनिल देशमुखांविरोधात आयकर विभागाला पुरावे सापडले!

नागपूर

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी आयकर विभागाने धाड टाकतात कारवाई केली. याचवेळी त्यांच्याशी आणि कुटुंबीयांशी संबंधित आणखी नागपूरातील एक प्रसिद्ध व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या (17 सप्टेंबरला) रोजी छापे टाकत जप्तीची कारवाई केल्याची विभागाने नाव न घेता प्रसिद्धी पत्रकातून माहिती दिली. या कारवाईत 17 कोटी रूपयाचे उत्पन्न दडपण्यात आले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. नागपूर, मुंबई, नवी दिल्ली आणि कोलकातामध्ये 30 ठिकाणी शोध घेतल्याचे सांगण्यात आले असले तरी कोणाचाही नावाचा उल्लेख करण्यात आला नाही.

आयकर विभागाने छापेमारी करत जप्तीची कारवाई केली. शोध आणि जप्ती कारवाई दरम्यान, अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे, सुटी कागदपत्रे आणि इतर डिजिटल पुरावे पथकाला मिळले असून कारवाई करण्यात आली. या करवाई मिळालेल्या पुराव्यांवरून लेखा पुस्तकांव्यतिरिक्त बेहिशेबी आर्थिक व्यवहारामध्ये या समूहाचा सहभाग असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले आहे. वाढीव खर्च, मनी लाँडरिंग, बनावट देणगी दिल्याच्या पावत्या, बेहिशेबी रोख खर्च इत्यादी बाबींचा खुलासाही या करवाई दरम्यान झाला आहे. मनी लॉन्ड्रिंगद्वारे समूहाकडून चालवण्यात येत असलेल्या ट्रस्टला दिल्लीतील कंपन्यांकडून 4 कोटी रुपये बनावट देणगी दिल्याचाही पुरावा सापडला आहे. बेहिशेबी उत्पन्न ट्रस्टला मिळालेली देणगी आहे असे दाखवत काळा पैसा पांढरा करण्यात आल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. संबधित ट्रस्टच्या तीन शैक्षणिक संस्थेच्या वाढीव खर्चात सहभागी असल्याचे पुरावे सापडले आहेत.

यामध्ये कर्मचार्‍यांना दिले जाणारे वेतन अंशत: रोख स्वरूपात पुन्हा परत घेतले होते. आर्थिक वर्षांचे पुरावे अधिकर्‍यांना मिळालेले आहे. ही रक्कम 12 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. छापेमारी दरम्यान आढळून आलेल्या ट्रस्टच्या पावत्या दडपण्या व्यतिरिक्त प्रवेश करण्या करण्यासाठी दलालांना 87 लाख रुपयांची रक्कम रोख स्वरूपात देण्यात आली असून ती पूर्णपणे बेहिशेबी असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. ठीकठिकाणी झालेल्या छापेमारी मोहिमेदरम्यान सापडलेल्या पुराव्यांवरून जवळपास 17 कोटी रुपयांचे उत्पन्न दडपण्यात आले आहे. तसेच अनेक बँक लॉकर्स सील केले गेले आहेत. सापडलेल्या पुराव्यांची तपासणी केली जात आहे. या प्रकरणात इतर बाबी तपासण्याचे का सुरू असल्याचेही प्रसिद्धी पत्रकातून सांगण्यात आले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!