राज्यात आज 3,131 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 70 रुग्णांचा मृत्यू

मुंबई,

कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ-उतार सुरुच आहे. राज्यात आज 3,131 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 021 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 44 हजार 744 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.02 टक्के आहे.

राज्यात आज 70 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 10, 875 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात सध्या 40 हजार 712 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 2,72,098 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1,704 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत आज 352 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तीन जणांचा मृत्यू

 मुंबईत गेल्या 24 तासात 352 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 363 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,15,757 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. कोरोना डबलिंग रेट 1177 दिवसांवर गेला आहे. 24 तासात एका कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

देशात 24 तासांत 26 हजार नवे कोरोनाबाधित, 252 रुग्णांचा मृत्यू

देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पाच दिवसांनी 30 हजारांहून कमी कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आज आरोग्यमंत्रालयानं जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 26,115 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 252 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशातच 34,469 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 35 लाख 4 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 45 हजार 385 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 27 लाख 49 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या चार लाखांहून कमी आहे. एकूण 3 लाख 9 हजार 575 रुग्ण अद्याप कोरोनावर उपचार घेत आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!