अडगळीत पडलेल्या नेत्याचे वैफल्यग-स्त भावनेतून वक्तव्य – सुनील तटकरे
मुंबई,
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर करण्यात आलेल्या शिवसेनेचे माजी मंत्री अनंत गीते यांच्या टीकेला राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. गीते यांचं वय झालं आहे. ते पराभूत झालेले आहेत. नैराश्यातून विधान करत आहेत. वैफल्यग-स्त भावनेतून गीते यांचे विधान असून सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे.
शिवसेना नेते अनंत गीते यांनी राष्ट्रवादीवर घणाघात करताना महाविकास आघाडी ही केवळ तडजोड आहे. राष्ट्रवादी-काँग-ेस एकत्र येऊ शकत नाही तर शिवसेना आणि काँग-ेस कसे एकत्र येतील, असे म्हणत त्यांनी शिवासेना नेतृत्त्वालाही घरचा आहेर दिला. राष्ट्रवादीने काँग-ेसच्या पाठीत खंजीर खुपल्याचा आरोप गीते यांनी केला होता. तसेच पवार यांचे नेतृत्व आम्ही कसे स्विकारु. आमचे नेते आणि नेतृत्व हे बाळासाहेब ठाकरे आहेत. पवार हे आमचे नेते होऊ शकत नाही, असे गीते यांनी जाहीर सभेत म्हटले होते. त्यानंतर राष्ट्रवादीकडून अधिकृत प्रतिक्रिया आली आहे.
शरद पवार हे देशाचे नेते आहेत – संजय राऊत
गीते यांनी बोलल्याने फरक पडत नाही. सुर्यावर थुंकल्यासारखे आहे. अडगळीत पडलेल्या नेत्यांना भान राहिलेले नसेल म्हणून असं वक्तव्य करण्यात आले आहे. तथाकथित स्वयंघोषित बेदखल झालेले अनंत गीते यांचं वक्तव्य मनावर घेण्यासारखे नाही. 2019 निवडणुकीत ज्यांना पराभूत केलं असे अनंत गीते, हे बोलत आहेत. वैफल्यग-स्त भावनेतून गीते यांचे हे विधान आहे. गीते अडगळीत पडलेले नेते आहेत. शरद पवार यांचे अढळ स्थान कोणा व्यक्तीच्या वक्तव्यामुळे ढळत नाही, असे सुनील तटकरे म्हणाले.
अनंत गीते कोणाची भाषा करत आहेत हे तेच सांगू शकतील. आघाडीचा धर्म पाळून रायगडमध्ये काम सुरू आहे. भक्कम विचारांनी स्थापना झालेले राज्यातील हे महाविकास आघाडी सरकार आहे. पाच वर्षे चांगले काम करत राहिल आणि आगामी निवडणुकीत हेच सरकार असेल, असे तटकरे म्हणाले.
कोकणात सौहार्दाच्या वातावरण काम करत आहोत, निधी वाटपावरून शिवसेना आमदार नाराज असतील असे वाटत नाही. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पालकमंत्री चांगले काम करत आहेत. रायगडमध्ये राष्ट्रवादीचे पालकमंत्री चांगले काम करत आहेत. त्यामुळे येथे नाराजी येण्याचा प्रश्नच नाही, असे तटकरे यावेळी म्हणाले.