ई – पीक पाहणी योजनेअंतर्गत दि. 30 सप्टेंबर 2021 पयर्ंत नोंदणी

जालना

राज्यात दि. 15 ऑगस्ट 2021 पासुन ई पीक पाहणी प्रकल्प राबविण्यात येत असुन या प्रकल्पात पीक पेरणीची माहिती स्वत: शेतकर्‍यांनी मोबाईल अ‍ॅपद्वारे गाव न नंबर 12 मध्ये नोंदविण्यासाठी उपलब्ध करुन देण्याच्या क्रांतीकारी कार्यक्रमाची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात येतआहे.

राज्याच्या काही भागामध्ये अतिवृष्टी, पुर, कोरोना महामारी व उशिराच्या मान्सुनमुळे आणि ई पीक पाहणी मोबाईल अ‍ॅपचा थोडा उशिरा शुभारंभ याचा विचार करुन खरीप हंगामाची पीक पाहणी नोंदविण्याचा कालावधी 30 सप्टेंबर 2021 पयर्ंत वाढविण्यात आलेला आहे.

जालना जिल्ह्यात मागील दीड महिन्यात फक्त 6 0 हजार 540 शेतकर्‍यांनी अ‍ॅप डाऊनलोड करुन नोंदणी पुर्ण केलेली आहे. उर्वरीत सर्व शेतकर्‍यानी सुध्दा त्यांचा पीकपेरा ई पीक पाहणी मोबाईल अ‍ॅपद्वारे विहित मुदतीत नोंदविण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या हेतुन दि. 24 सप्टेंबर 2021 रोजी मोहिम स्वरुपात जिल्ह्यात 2 लाख 86 हजार 200 शेतकर्‍यांनी पीकपेरा नोंदणी पुर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे. त्याबाबतची सर्व जबाबदारी संबंधित उपविभागीय अधिकारी यांचेवर सोपविण्यात येत आहे. उपविभागीय अधिकारी यांनी त्यांचे अधिकनस्त तालुक्यासाठी दि. 21 सप्टेंबर 2021 ते 23 सप्टेंबर 2021 पयर्ंत तालुकास्तरावर सुक्ष्म नियोजन करुन ही मोहिम यशस्वी करावी. त्यासाठी त्यांनी प्रत्येक गावासाठी उद्दिष्टानुसार कमी, अधिक याप्रमाणे स्वयंसेवकांची संख्या निश्चित करणे, त्यांचे प्रशिक्षण आयोजित करणे, शेतकर्‍यांना ई- पीक पाहणी बाबत असलेले भ-मणध्वनी अ‍ॅपद्वारा मोबाईल
अ‍ॅप गाव न.नंबर 12 मध्ये नोंदविण्याबाबत प्रोत्साहित करणे व सदर मोहिम गावनिहाय, आपल्या अधिनस्त तालुक्यात 100 टक्के यशस्वी राबविणेबाबत सुक्ष्म नियोजन करुन तसे या कार्यालयास कळविण्यात यावे.

जिल्ह्यात एकुण 954 गावे ऑनलाईन असुन प्रत्येक गावातील किमान 300 शेतकर्‍यांची नोंदणी पुर्ण करावयाची आहे. त्यानुसार तालुका निहाय गावाची संख्या व उद्दिष्ट खालीलप्रमाणे नेमुन देण्यात येत आहे.

अ.क्र.

तालुका

गावांची संख्या

प्रत्येक गावासाठी 15 किंवा उद्दिष्टानुसार कमीअधिक याप्रमाणे स्वयंसेवकांची संख्या निश्चित करावी

प्रत्येक स्वयंसेवकाने 20 शेतकर्‍यांची नोंदणी केल्यास पुर्ण होणारे काम

(उद्दिष्टानुसार कमीअधिक)

1

जालना

144

2160

43200

2

भोकरदन

157

2355

47100

3

जाफ्राबाद

101

1515

30300

4

बदनापुर

86

1290

25800

5

अंबड

138

2070

41400

6

घनसावंगी

117

1755

35100

7

परतुर

98

1470

29400

8

मंठा

113

1695

33900

एकुण

954

14310

286200

वरील कॅलक्युलेशन उद्दिष्ट साध्य होण्याच्या दृष्टीकोनातुन हायर एंड ला सर्वसाधारपणे करण्यात आले आहेत.

सदर मोहिम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक गावनिहाय नियोजन व जनजागृती करावयाची असुन त्यासाठी तलाठी, कृषी सहाय्यक, पोलीस पाटील,रोजगार सेवक,रेशन दुकानदार, शेतीमित्र, कोतवाल, प्रगतीशील शेतकरी, आपले सरकार सेवा केंद्रचालक, ण्एण् केंद्रचालक संग्राम केंद्र चालक, कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी असल्यास, तरुण मंडळाचे पदाधिकारी अशा स्वयंसेवकाची निवड करुन त्यांचे सहाय्याने गावातील शेतकर्‍यांना पीकपेरा भरण्याबाबत मार्गदर्शन करावयाचे आहे व पीकपेरा भरुन घेण्याची कार्यवाही अनुसरावयाची आहे.

प्रत्येक गावासाठी पंधरा किंवा गरजेनुसार कमी, अधिक स्वयंसेवकांची निवड करण्यात यावी व त्यांना दि. 23 सप्टेंबर 2021 रोजी आपल्या तालुक्यातील मास्टर ट्रेनर्स मार्फत ई-पीक पाहणी अ‍ॅपचे प्रशिक्षण देण्यात यावे.

उपविभागीय अधिकारी यांनी मोहिमेच्या दिवशी दि. 24 सप्टेंबर 2021 रोजी प्रत्येक दोन तासावंनी आढावा घ्यावा व जिल्ह्यात 2 लाख 86 हजार 200 शेतकर्‍यांचे पीकपेरा नोंदणी पुर्ण करण्याचे निश्चित केलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!