नरेंद्र गिरी महाराजांना स्वाक्षरी करणंही कठीण होतं मग…’, 7 पानी सुसाइड नोट समोर आल्यानंतर आता मोठा टिवस्ट

वाराणसी,

आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. यानंतर घटनेला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. अखिल भारतीय संत समितीचे महामंत्री जितेंद्रानंद सरस्वती यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार महंत नरेंद्र गिरी यांना स्वाक्षरी करणंही मुश्कील होत असे, अशावेळी ते एवढी मोठी सुसाइड नोट कशी लिहू शकतील? या प्रकरणी सापडेलेली सुसाइड नोट तपासाचा मोठा आधार होता. अशावेळी जितेंद्रानंद सरस्वती यांनी उपस्थित केलेल्या सवालामुळे या प्रकरणात मोठा टिवस्ट आला आहे.

आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह प्रयागराजमधील बाघंबरी मठ याठिकाणी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्यांच्या मृत्यूनंतर खोलीचा तपास केला असता एक सुसाइड नोट सापडली होती. या नोटमध्ये त्यांनी एका शिष्याचा उल्लेख केला आहे. या शिष्यामुळे महंत तणावात होते. पोलिसांनी आता महंत यांचे शिष्य आनंद गिरी यांना ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.

प्रयागराज पोलिसांनी महंतांच्या मृत्यूबाबत एक नोट जारी केली आहे. यानुसार, घटनास्थळाहून 6 ते 7 पानी सुसाइड नोट सापडली आहे. यामध्ये महंत नरेंद्र गिरी यांनी आनंद गिरी आणि अन्य शिष्यांची नावं लिहिली आहेत. अनेक कारणांमुळे ते त्रस्त होते, असं या सुसाइड नोटमुळे समोर त आहे. त्यामुळे ते आत्महत्या करीत असल्याचं लिहिलं होतं. यावेळी महंतांनी त्यांची संपती, आश्रम कोणाला दिला जावा, किंवा कोण याची काळजी घेईल याबद्दल देखील लिहिलं आहे. शिष्यांमुळे दुखी असल्या कारणाने आत्महत्या करीत असल्याचं त्यांनी सुसाइड नोटमध्ये लिहिलं आहे.

आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी प्रयागराज पोलिसांनी अनेक राजकीय पक्षांशी संबंधित अर्धा डझनहून अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे. सूत्रांकडून आलेल्या बातमीनुसार या सर्व लोकांची चौकशी केली जात आहे.

ताब्यात घेतल्यानंतर, आनंद गिरी म्हणाले की गुरुजी कधीही आत्महत्या करू शकत नाहीत, त्यांची हत्या झाली आहे. ते म्हणाले की, खुद्द आईजी यामध्ये संशयास्पद आहेत. आईजी सतत नरेंद्र गिरीच्या संपर्कात होते. आनंद गिरी यांनी आरोप केला की ज्यांनी मठ आणि मंदिराचे पैसे हडप केले त्यांनी महंतजींची हत्या केली आहे. मठातील अनेक मोठी नावे या कटात सामील असू शकतात. हा कोट्यवधींचा खेळ आहे. मात्र महंत नरेंद्र गिरी यांच्या जवळ सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये आनंद गिरी, आद्या तिवारी आणि संदीप तिवारी यांच्यावर मानसिक छळ केल्याचा आरोप आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!