विराट आयपीएलमध्ये ठउइ सोडून ’या’ संघाकडून खेळू शकतो, दिग्गज गोलंदाजाची भविष्यवाणी

मुंबई

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची आयपीएलच्या 14 व्या मोसमातील दुसर्‍या टप्प्याची सुरुवात पराभवाने झाली. कोलकाताने विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणार्‍या बंगळुरुचा 9 विकेटसने पराभव केला. विराटने या आयपीएलच्या दुसर्‍या टप्प्याआधी टीम इंडियाच्या टी 20 कर्णधारपदावरून पायऊतार होणार असल्याचं जाहीर केलं.

त्यानंतर विराटने या 14 व्या हंगामानंतर आरसीबीची कॅप्टन्सी सोडणार असल्याचं सांगितलं. बॅटिंगवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त होत असल्याचं विराटने सांगितलं. दरम्यान विराटच्या या मोठ्या निर्णयानंतर क्रिकेट विश्वात उलटसुलट चर्चांना उधाण आलंय. त्यात आता दक्षिण आफ्रिकेचा आणि आयपीएलमध्ये बंगळुरुकडून खेळलेला ’स्टेन गन’ अर्थात डेल स्टेनने मोठी भविष्यवाणी केली आहे.

स्टेन काय म्हणाला?

ठविराटने बंगळुरु संघ सोडला तर एक टीम त्याचं आपल्या गोटात स्वागत करु शकतं. तो संघ दुसरा तिसरा कोणी नसून दिल्ली कॅपिटल्स आहे.

ठतुम्ही किती मोठे खेळाडू आहात, याने काहीही फरक पडत नाही. पण तुम्ही स्वत:च्या प्रगतीबाबत भविष्याचा विचार करु शकता. आम्ही ख्रिस गेलला टीम सोडून जाताना पाहिलंय‘, असं डेल स्टेन म्हणाला. तो ईएसपीएनसोबत बोलत होता. ख्रिस गेल आधी कोलकाताकडून खेळायचा. त्यानंतर गेल पंजाबमध्ये आला.

कोहलीबाबत मोठी भविष्यवाणी

ठडेव्हिड बॅकहमने मॅनचेस्टर सोडलं. या सर्व दिग्गजांनी दीर्घकाळ क्लबचं प्रतिनिधित्व केलं. त्यानंतर क्लबला रामराम ठोकला. विराट कोहली मूळचा दिल्लीचा आहे. आयपीएलमध्ये दिल्लीही प्रतिनिधित्व करते. विराट बोलू शकतो की आमच्यासह या आणि सर्व प्रकरणाला पूर्णविराम द्या‘, असंही स्टेनने नमूद केलं. त्यामुळे आता विराट यावर काय बोलणार का, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!