’रन मशीन’ मिताली राजचा करिश्मा, महिला क्रिकेटमध्ये रचला आणखी एक विक्रम

मुंबई,

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने तिच्या कारकिर्दीत 20 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. यात स्थानिक क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील धावांचा समावेश आहे. तिने हा विक्रम ऑॅस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्याच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात पूर्ण केला. मिताली राजने या सामन्यात 61 धावांची खेळी केली. मितालीचे हे सलग पाचवे अर्धशतक ठरले. तिने याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद 79 धावांची खेळी केली होती. त्यानंतर तिने इंग्लंडविरूद्धच्या तीन सामन्याच्या मालिकेत 72, 59 आणि नाबाद 75 धावा केल्या होत्या.

टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती

मिताली राजने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. या फॉरमॅटमध्ये तिने 2 हजार 354 धावा केल्या. ती ऑॅलओव्हर टॅलीमध्ये सातव्या स्थानावर आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी मिताली राज –

मिताली राज एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी पहिली महिला खेळाडू आहे. तिने 218 सामन्यात 7 हजार 365 धावा केल्या आहेत. या यादीत इंग्लंडची चार्टोट एडवर्ड दुसर्‍या स्थानावर आहे. तिच्या नावे 5 हजार 992 धावा आहेत.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये गाठलं अव्वलस्थान –

मिताली राजने ऑॅस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 61 धावांची खेळी करत आयसीसी फलंदाजी क्रमवारीत अव्वलस्थान कायम ठेवलं. यासामन्याआधी ती दक्षिण आफ्रिकेची लिजेल ली याच्यासोबत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर होती. आता तिने लीला खाली ढकललं आहे.

भारतीय महिला संघाचा दारूण पराभव – डार्सी ब-ाउन (433) हिची शानदार गोलंदाजी यानंतर रेचल हेन्स (नाबाद 93) आणि एलिसा हिली (77) यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर ऑॅस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने भारतीय महिला संघाचा 9 गडी राखून पराभव केला. यजमान ऑॅस्ट्रेलिया संघाने या विजयासह 3 सामन्याच्या मालिकेत 1-0 ने आघाडी

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!