गुजरात जेलमध्ये अतीक अहमदाना भेटण्याची ओवैसीना परवानगी नाकारली

अहमदाबाद,

ऑल इंडिया मजलिस -ए-इत्तेहादूल मुस्लिमीन (एआयएमआयएम) चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसीना सोमवारी अहमदाबादमधील साबरमती केंद्रिय कारागृहामध्ये माजी खासदार अतीक अहमद यांना भेटण्याची परवानगी दिली गेली नाही.

एआयएमआयएमचे अध्यक्ष व हैद्राबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी पक्षाच्या काही नेत्यांसह सोमवारी सकाळी अहमदाबादला पोहचले परंतु गुजरात जेल अधिका-यांनी त्यांना अतीक अहमद यांना भेटण्याची परवानगी दिली नाही. अहमद हे नुकतेच एआयएमआयएममध्ये सामिल झाले होते.

एआयएमआयएमच्या सूत्रांने हैद्राबादमध्ये सांगितले की ओवैसीना सकाळी 11 वाजता अतीक अहमद यांना भेटण्यासाठी साबरमती केंद्रिय कारागृहात पोहचायचे होते. मात्र एसपी केंद्रिय कारागृहाने कोविड-19 महामारीचा हवाला देत अंतिम क्षणी भेट घेण्याला परवानगी देण्यास नकार दिला.

ओवैसींच्या बरोबर महाराष्ट्रातील औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील, गुजरा एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष साबिर काबलीवाल आणि ग-ेटर हैद्राबादचे माजी महापौर व उत्तर प्रदेशमधील एआयएमआयएमचे प्रभारी माजित हुसैनही होते.

अतीक अहमदांची पत्नी शाइस्ता परवीनही या महिन्याच्या सुरुवातीला लखनऊमध्ये ओवैसींच्या उपस्थितीमध्ये एआयएमआयएममध्ये सामिल झाल्या होत्या. समाजवादी पक्षाचे माजी नेते अतीकही अनुपस्थितीमध्ये एआयएमआयएममध्ये सामिल झाले होते.

ओवैसीनी अतीक अहमद आणि त्यांच्या पत्नीना पक्षात सामिल करत दावा केला की सपा आणि बहुजन समाज पक्ष (बसपा) ने आपल्या पक्षामध्ये मुसलमानाचा गुलामाच्या रुपात वापर केला.

अतीक अहमदच्या विरोधात अनेक गुन्हेगारी गुन्हे नोंदविले गेले आहे. त्यांना सामिल करण्याच्या आपल्या निर्णयाचा बचाव करत ओवैसीनी दावा केला की अनेक भाजप नेतेही अनेक प्रकरणांचा सामना करत आहेत.

अतीक अहमदच्या विरोधात हत्या, अपहरण, अवैध खनन, खंडणी, धमकी आणि धोकाधडीसह 90 पेक्षा अधिक गुन्हेगारी प्रकरणे आहेत. त्यांना 2019मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशावरुन उत्तर प्रदेशातून गुजरातला स्थानांतरीत करण्यात आले होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!