खालिदा झियांचे जेल निलंबन अजून सहा महिन्यानी वाढविले
ढाका,
बांगलादेश सरकारने माजी पंतप्रधान खालिदा झियांच्या जेल शिक्षेच्या निलंबनाला अजून सहा महिन्यांनी वाढविले आहे अशी घोषणा गृहमंत्री असुदज्जमां खान यांनी करत म्हटले की त्या घरीच राहून उपचार करु शकतात परंतु या दरम्यान त्या देश सोडू शकणार नाहीत.
बांगलादेश नॅशनलिस्ट पक्ष (बीएनपी) च्या प्रमुख खालिदा झिया यांचे कुटुंबीय दिर्घकाळा पासून चांगल्या उपचारासाठी त्यांना विदेशी जाण्यासाठी परवानगी देण्याची मागणी करत होते. यानंतर सरकारचा हा निर्णय समोर आला आहे.
देशात कोविड-19 च्या प्रकोपानंतर मानवीय आधारावर बांगलादेश सरकारने मागील वर्षी मार्चमध्ये झियाना सहा महिन्यांसाठी जेलमधून मुक्त करण्याचा निर्णय केला होता व यानंतर याला अनेक वेळा वाढविले गेले होते.
राजधानी ढाकामधील बंगबंधु शेख मुजीब वैद्यकिय विद्यापीठ (बीएसएमएमयू) मध्ये उपचार घेतल्यानंतर खालिदा झिया 20 मार्च 2020 ला बाहेर आल्या होत्या. एप्रिल 2018 मध्ये त्या आजारी पडल्यानंतर त्यांना बीएसएमएमयूमध्ये स्थानांतरीत केले गेले होते आणि त्या तेथेच राहत होत्या.
बीएनपीच्या अध्यक्षा खालिदा झिया अनाथलय ट्रस्ट भ-ष्टाचार प्रकरणात 8 एप्रिल 2018 पासून जेलमध्ये आहेत. कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात त्यांच्या वकिलांनी अपिल केल्यानंतर 10 ऑक्टोंबर 2019 ला त्याच्या शिक्षेला अजून पाच वर्षाने वाढविले गेले.
या दरम्यान झियाना चॅरिटेबल ट्रस्ट भ-ष्टाचार प्रकरणात 27 ऑक्टोंबर 2019 ला एका विशेष न्यायालयाने दोषी ठरविले होते व सात वर्षाची शिक्षा सुरनावली गेली होती. त्यांच्या विरोधात अजूनही कमीत कमी 36 प्रकरणे सुरु आहेत.