भाजपचा अखिलेश यादव आणि असदुद्दीन ओवैसींवर ‘अब्बा जान’चे कार्टून शेअर करत निशाणा

नवी दिल्ली,

उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार येण्यापूर्वी भेदभाव केला जात होता. पण आता सर्वांना समान न्याय मिळतो. जे 2017 पूर्वी फक्त ‘अब्बा जान’ म्हणत होते, तेच रेशन संपवत असल्याचे वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले होते. त्याचबरोबर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर त्यांनी टीका केली होती. त्यांच्या या टीकेनंतर उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. मोठ्या प्रमाणात योगींवर टीका देखील झाली होती. हा वाद निवळत असतानाच आता भाजपने पुन्हा एकदा अब्बा जानचे एक व्यंगचित्र शेअर केल्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे.

हे व्यंगचित्र उत्तर प्रदेश भाजपने शेअर करून एएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला आहे. ओवैसी आणि अखिलेश यादव यांना व्यंगचित्रात मुघल स्र-ाट जहांगीर आणि अनारकली दाखवले आहे, जे गरीबांच्या रेशनचा गैरवापर करत आहेत. तर ‘अब्बा जान’ म्हणून मुलायमसिंह यादव यांना दाखवले असून ते रेशनचा गैरवापर होताना बघत बसले आहेत.

दरम्यान, अखिलेश यादव यांनी योगी आदित्यनाथ यांच्या अब्बा जान टीप्पणीनंतर त्यांच्यावर टीका केली होती. चार वर्षांहून अधिक काळानंतरही, हे सरकार केवळ नावे आणि रंग बदलण्यात व्यस्त आहे. सपा सरकारने केलेली कामे स्वत:ची असल्याचा दावा करत आहे. त्यांना माहित आहे की त्यांचे सरकार बाहेर पडण्याच्या मार्गावर असल्यामुळे त्यांची भाषा बदलली असल्याचे अखिलेश यादव म्हणाले होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!