कॅप्टन्सी सोडण्याच्या निर्णयावरुन गंभीरचा विराटवर निशाणा, म्हणाला….

मुंबई,

आयपीएलच्या 14 व्या मोसमातील दुसर्‍या टप्प्याला 19 सप्टेंबरपासून सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात चेन्नईने मुंबईचा पराभव केला. या दरम्यान विराट कोहलीने मोठी निर्णय घेतला. विराट कोहली टीम इंडियाच्या टी 20 वर्ल्ड कपनंतर कर्णधारपद सोडणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यात आता विराटने आयपीएलच्या 14 व्या मोसमानंतर आरसीबीची कॅप्टन्शीप सोडणार असल्याचं जाहीर केलं.

विराटच्या या निर्णयावरुन टीम इंडियाचा आणि कोलकाताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने विराटवर तोफ डागली आहे.

गंभीर काय म्हणाला?

ठआयपीएलच्या 14 व्या मोसमातील दुसर्‍या टप्प्याच्या आधी या निर्णयामुळे मला आश्चर्य वाटलं. विराटला स्पर्धा संपल्यानंतरही हा निर्णय घेता आला असता. विराटच्या या निर्णयामुळे संघ अस्थिर होऊ शकतो. तसेच काही प्रमाणात संघ भावनिक होऊ शकतो‘, असं गंभीर म्हणाला. गंभीर विशेष कार्यक्रमात सामील झाला होता. यावेळेस त्याने ही प्रतिक्रिया दिली.

गंभीरनुसार, विराटच्या या निर्णयाचा परिणाम सांघिक कामगिरीवर होईल. ‘बंगळुरु या मोसमात दमदार कामगिरी करतेय. असं असताना तुम्ही टीमवर कशासाठी दडपण आणू इच्छिता. विराटवर संघाला आयपीएलंच विजेतपद जिंकून देण्याचा अतिरिक्त दबाव आहे. तुम्हाला एका व्यक्तीसाठी विजेतेपद जिंकायचं नाहीये, तुम्हाला ते टीमसाठी करायचं आहे‘, असं गंभीरने स्पष्ट केलं.

दरम्यान विराटने आठवड्याभरात दुसरा मोठा निर्णय घेतला. विराटने आधी टी 20 वर्ल्ड कपनंतर कर्णधारपदावरुन पायऊतार होणार असल्याचं स्पष्ट केलं. तर यानंतर बंगळुरुचंही कॅप्टन्सी सोडणार असल्याचं जाहीर केलं. बॅटिंगवर अधिक लक्ष देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं विराटने स्पष्ट केलं.

बंगळुरुने आयपीएलच्या 14 व्या मोसमात आतापर्यंत 7 सामने खेळले आहेत. बंगळुरुने यापैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे तर 2 सामन्यात पराभव स्वीकारावा लागलाय. बंगळुरु पॉइंटसटेबसमध्ये 10 गुणांसह तिसर्‍या क्रमांकावर आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!