अनुराधा पौडवाल यांनी ’या’ कारणामुळे बॉलिवूडला ठोकला राम-राम
मुंबई
सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी हिंदी संगीत इंडस्ट्रीत आपल्या करिअरची सुरुवात एका वेळी केली जेव्हा लता मंगेशकर आणि आशा भोसले सारख्या गायिकांचा दबदबा होता. आणि त्यांनी यशाचा झेंडा रोवला होता. पण त्यांच्यातही अनुराधा पौडवाल यांनी स्वत:चं अस्तित्व निर्माण केलं. पण कोणालाही समजले नाही की अनुराधा पौडवाल यांनी हिंदी गाणी वगळता भक्तिगीते आणि भजने का गायला सुरुवात केली?
त्यांनी नुकताच ’द कपिल शर्मा शो’ मध्ये याचा खुलासा केला. अनुराधा पौडवाल व्यतिरिक्त गायक उदित नारायण आणि कुमार सानू देखील कपिलच्या शोमध्ये पोहोचले. कपिल शर्माने जेव्हा अनुराधा पौडवाल यांना शोमध्ये विचारले की त्यांनी बॉलिवूडमध्ये खूप चांगली गाणी गायली आहेत, मग तिने इंडस्ट्री सोडून भजन गायला सुरुवात का केली?
यावर अनुराधा पौडवाल म्हणाल्या, ’फिल्म इंडस्ट्रीमध्ये, दिग्दर्शक, निर्माते किंवा जेव्हाही एखादा चित्रपट हिट किंवा हिरो-हिरोईन होतो, तेव्हा त्यांच्या मूडवर गाण्यांची ऑॅफर मिळते. त्यामुळे मला थोडे असुरक्षित वाटत होते. आणि मला नेहमी भक्ती-भजन आवडायचे. म्हणूनच मी बॉलिवूड सोडून भजन, भक्तिगीते गाण्यास सुरुवात केली.
कारण आपल्याकडे भक्ती-भजनात भरपूर साहित्य आहे. जर तुम्ही ते समर्पणाने केले नाही तर तुम्ही इतका वेळ देऊ शकत नाही. माझ्या मते, जेव्हा लोकप्रियतेचे शिखर होते, ’आशिकी’, ’दिल है की मानता नहीं’, हे सर्व चित्रपट हिट होते. त्यानंतर मी भक्ती संगीताकडे वळले.