अखेर राज कुंद्राला जामीन मंजूर, अडीच महिन्यानंतर घेणार मोकळा श्वास
मुंबई,
पॉर्न रॅकेट प्रकरणी अटकेत असलेल्या अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा आणि रायन थॉर्प यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने 1467 पानांचे पुरवणी आरोपपत्र सादर केल्यानंतर त्याने मुंबई सत्र न्यायालयातून त्याचा जामीन अर्ज मागे घेतला होता. त्यानंतर त्याने पॉर्नोग-ाफी प्रकरणात मुंबई पोलिसांनी पुरवणी आरोपपत्र दाखल केल्यानं त्याच आधारावर कुंद्रा जामीनासाठी दावा दाखल केला होता. आरोपपत्र दाखल झाल्यानं मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टाकडनं दोन्ही आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला. अखेर त्याला 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे.
राज कुंद्रा अडीच महिने होता अटकेत
फिल्म इंडस्ट्रीमध्ये नवोदित कलाकारांना अर्धनग्न, नग्न चित्रे आणि व्हिडीओ काढण्याचे आमिष दाखवले गेले होते, जे नंतर अपलोड केले गेले. कुंद्रा अंधेरी येथील विआन इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या त्यांच्या स्वत:च्या कार्यालयातून हॉटशॉटस अॅप चालवत असे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करण्यास इच्छुक तरुणींना ब-ेक देण्याचे बहाण्याने अलि चित्रफिती बनवून त्या प्रसारीत करणार्या राज कुंद्रा व रायन थॉर्प यांची नावे गुन्हे शाखेने चार्जशीटमध्ये नोंदवली आहेत. राज कुंद्रा आणि रायन थॉर्प यांना मुंबई गुन्हे शाखेने 1 जुलै रोजी अटक केली होती.
ब-ेक देण्याचे बहाण्याने अलि चित्रफिती –
फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करण्यास इच्छुक तरुणींना ब-ेक देण्याचे बहाण्याने अलि चित्रफिती बनवून त्या प्रसारीत करणार्या पॉर्न फिल्म प्रॉडक्शन कंपनीबाबत माहिती प्राप्त झाल्याने दिनांक 04022021 रोजी मालमत्ता कक्ष, गुन्हे शाखा यांनी पर्दापाश करून मालवणी पोलीस ठाणे गु.र.क्र. 103 2021 गुन्हा नोंद करून 5 आरोपींना अटक केले होते. सदर गुन्ह्याचे तपासादरम्यान एकूण 09 आरोपींना अटक करून त्यांचेविरुध्द दिनांक 01042021 रोजी न्यायालयात एकूण 3529 पानांचे दोषारोपपत्र दाखल करून तपास सुरु होता.
पॉर्न फिल्मबाबत बरेच पुरावे –
पॉर्न केसमधील मुख्य सूत्रधार याचा मालमत्ता कक्षामार्फत तपास सुरु असताना तपासादरम्यान तांत्रिक विेषण, साक्षीदारांचे जबाब व जप्त कागदपत्रांवरुन हॉटशॉटस् अॅपचा सूत्रधार राज कुंद्रा हाच असल्याचे आढळून आले. न्यायालयाकडून सर्च वॉरन्ट प्राप्त करून राज कुंद्रा यांच्या अंधेरी येथील कार्यालयाची झडती घेतली असता त्यामध्ये पोर्न फिल्मबाबत बरेच पुरावे प्राप्त झाले. त्याआधारे रिपु सुदन कुंद्रा उर्फ राज कुंद्रा व त्याचे विआन इंडस्ट्रीज कंपनीतील आय. टी. हेड रायन जॉन थॉर्प यांना या गुन्हयात दिनांक 19072021 रोजी अटक करण्यात झाली होती.