इथेनॉलच्या पुरवठ्यासाठी आगामी समर्पित इथेनॉल संयंत्रांसह दीर्घकालीन करार करण्यासाठी पहिल्या स्वारस्य देकाराला भरघोस प्रतिसाद

मुंबई,

इथेनॉलच्या पुरवठ्यासाठी आगामी समर्पित इथेनॉल संयंत्रांसह दीर्घकालीन करार करण्यासाठीच्या पहिल्या स्वारस्य देकाराला (ईओआय) भरघोस प्रतिसाद मिळाला आहे, यासाठी 197 निविदा आल्या आहेत. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली तेल विपणन कंपन्यांच्या वतीने बीपीसीएलने 27 ऑॅगस्ट रोजी स्वारस्य देकार मागवण्यात आले होते आणि जे 17 सप्टेंबर रोजी खुले करण्यात आले. सध्या या प्राप्त निविदांचे मूल्यमापन सुरू आहे.

ईओआय यशस्वी करण्यासाठी सर्व निविदाकारांचे आभार मानत आणि त्यांना त्यांच्या उपक्रमांसाठी शुभेच्छा देत,केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू ,गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री श्री हरदीप सिंह पुरी म्हणाले की, हे ईओआय म्हणजे इथेनॉलची कमतरता असलेल्या राज्यांमध्ये इथेनॉल उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी प्रकल्प प्रस्तावकांना प्रेरित करण्याच्या दृष्टीने, पेट्रोलियम आणि नैसर्गीक वायू मंत्रालय आणि तेल कंपन्यांनी उचललेले एक सक्रिय पाऊल आहे,त्यामुळे येत्या काळात पेट्रोलमध्ये 20म आणि त्याहून अधिक इथेनॉल मिश्रण उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने पुढे जाण्याचा देशाचा मार्ग मोकळा झाला आहे.

गेल्या वर्षी देशात 173 कोटी लिटर इथेनॉल खरेदी करण्यात आले होते आणि इथेनॉल पुरवठा वर्ष – 2019-20 दरम्यान 5म इथेनॉल मिश्रण उद्दिष्ट साध्य झाले .चालू इथेनॉल पुरवठा वर्ष- 2020-21 चे लक्ष्य 325 कोटी लिटर इथेनॉल खरेदीचे आहे आणि त्यामुळे पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट 8.5म पर्यंत जाईल.इथेनॉल पुरवठा वर्ष – 2020-21 दरम्यान आतापर्यंत प्रत्यक्ष खरेदी 243 कोटी लिटर झाली आहे, ज्यामुळे 8.01म इथेनॉल मिश्रण उद्दिष्ट साध्य होणार आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!