लेखा परीक्षण प्रणाली सखोल जाणून घेण्याची अनोखी संधी आणि सुधारणा सुचवण्यासाठी कॅगला उत्तम स्थान पुरवते- राष्ट्रपती

मुंबई,

लेखा परीक्षण, प्रणाली सखोल जाणून घेण्याची अनोखी संधी आणि सुधारणा सुचवण्यासाठी कॅगला उत्तम स्थानही पुरवते असे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी म्हटले आहे. भारतीय लेखा परीक्षण आणि लेखा सेवा अधिकार्‍यांच्या 2018 आणि 2019 तुकडीच्या प्रशिक्षणार्थीच्या समारोप कार्यक्रमात ते आज सिमला इथे बोलत होते.

कोविड-19 महामारीमुळे अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. हा प्रभाव कमी करण्यासाठी आणि गरिबांच्या कल्याणासाठी सरकारने विविध वित्तीय उपाययोजना केल्याचे त्यांनी सांगितले. कॅग अर्थात नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांना, देखरेख ठेवताना प्रणालीतल्या सुधारणेसाठी माहिती पुरवण्याच्या संधी ज्ञात असाव्यात असे राष्ट्रपती म्हणाले. कॅग सारख्या संस्थांनी दिलेल्या संस्थाच्या सल्ल्याची सरकारने गंभीर दखल घ्यावी, याचा सार्वजनिक सेवा वितरण स्तराच्या गुणवत्तेवर सकारात्मक प्रभाव होईल असे ते म्हणाले.

नागरिकांच्या सुविधेसाठी सरकारी प्रक्रिया मोठ्या प्रमाणांत डिजिटल करण्यात येत आहेत. तंत्रज्ञानाचा झपाट्याने विस्तार होत असल्याने प्रशासन आणि नागरिक यांच्यातले अंतर कमी होत चालल्याचे राष्ट्रपती म्हणाले. थेट लाभ हस्तांतरणा सारख्या सुविधांमुळे केवळ एक बटण दाबून देशातल्या दुर्गम भागातल्या गरीब नागरिकांपर्यंत पैसे पोहोचू शकतात. लेखा परीक्षणाच्या दृष्टीने हे छोटे आव्हान आणि मोठी संधी आहे. अद्ययावत विेषणात्मक साधनांचा उपयोग करत, दूरवर प्रवास न करताही, मोठ्या प्रमाणातल्या डाटामधून डाटा मधून हवी असेल ती माहिती वेगळी करता येते. यामुळे लेखा परीक्षण अधिक केंद्रित आणि प्रभावी होते.

आपल्या भावी पिढ्यांसाठी आपल्याला कराव्या लागणार्‍या त्यागाची आपल्याला जाणीव करून देण्यात कॅगची मोठी भूमिका असल्याचे राष्ट्रपती म्हणाले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!