बायोडिझेल च्या अवैद्य साठवणूक व विक्रीवर पुरवठा विभागाची धडक कारवाई..
प्रतिनिधी: ( सुमित शर्मा – mob- 8530283226 )
सविस्तर वृत्त असे:मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णार्ड शिवारातील असलेल्या मोकळ्या जागेत बायोडिझेल ची बेकायदेशीर साठवणूक व काळाबाजार करून विक्री करतांना पुरवठा विभागाने छापा टाकून सुमारे १०लाख ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.दोन वेक्तींना अटक केली असून चार वेक्तींवर मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णार्ड शिवारात मुक्ताईनगर बऱ्हाणपूर रस्त्यावर असलेले मुक्ताईनगर तोल काटा येथे राजेंद्र सिताराम वाघले यांच्या मालकीच्या जागेत बायोडिझेलची मोठ्या प्रमाणात साठवणूक करून त्याची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मुक्ताईनगर पुरवठा निरीक्षक यांना मिळाली.
त्यानुसार रविवार १९ सप्टेंबर रोजी रात्री १ वाजता पुरवठा विभागाने छापा टाकून सुमारे ६ लाख ६६ हजार रुपये किमतीचे बायोडिझेल आणि ४ लाख ९ हजार ४७०रुपयांची रोकड असा एकूण १० लाख ७५हजार ४७० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी पुरवठा निरीक्षक ऋषिकेश तानाजी यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी निलेश युवराज सपकाळे राहणार निसर्ग कॉलनी आसोदा रोड जळगाव, राजेंद्र सिताराम वाघले रा. शहापूर, रितेश नारायणराव दोरतनी(वय -२१) रा.परतवाडा अचलपूर अमरावती, चिराग गोपाल शिरथ(वय -२६) रा.आसोदा रोड जळगाव यांच्यावर मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात दोन व्यक्तींना अटक केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ करीत आहे.