’ज्यांना पतंग उडवायची, त्यांनी उडवावी’! अखेर संजय राऊतांनी चर्चेला दिला पूर्णविराम

मुंबई,

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद मध्ये असताना केलेल्या एका विधानामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. एका कार्यक्रमात रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्याकडे बघून त्यांनी फआजी, माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारीङ्ग, असा उल्लेख केल्यानंतर शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या विधानाचा अर्थ आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितला आहे. फज्यांना पतंग उडवायचीये, त्यांनी उडवावी. कुणाची पतंग कधी कापायची, हे आम्हाला समजतं. मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची, शिवसेना भवन फोडण्याची भाषा करणार्‍यांशी युती कशी होणार?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

काही दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी शिवसेना भवन तोडण्याची भाषा केली होती. काही केंद्रीय मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची भाषा केली. त्यांच्याशी युती कशी होणार?, असा सवाल करतानाच युती आम्ही तोडली नाही. त्यांनीच तोडली असेही राऊत म्हणाले. विधानसभेत आम्ही एकत्र आहोत. लोकल लेव्हलला भाजपसोबत जाणे ही लोकांशी गद्दारी ठरेल. औरंगाबादमध्ये धर्मांध शक्ती थोपवायला आम्ही तिघे समर्थ आहोत. तसे नसते तर दोन वर्ष सरकार सुरळीत चाललं नसतं. तिन्ही पक्षात सर्वकाही अलबेल आहे, असेही राऊत म्हणाले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!