रेल्वे ट्रॅक, ब्रिज उडवण्याचे प्रशिक्षण, पाकिस्तानामधून कॉलिंग अ‍ॅपची मदत

मुंबई,

मुंबईतील लोकलमध्ये विषारी गॅस हल्ल्याचा दहशतवाद्यांचा कट होता. त्याचवेळी जान मोहम्मद यालाही रेल्वे ट्रॅक आणि बि-ज उडवण्याचं प्रशिक्षण देण्यात आले होते. पाकिस्तानातून कॉलिंग अ‍ॅपद्वारे जानला रेल्वे ट्रॅक, बि-ज उडवून देण्याचे निर्देश दिले गेले होते. हे निर्देश हँडलर मोहम्मद रहिमुद्दीन द्यायचा अशी माहिती पुढे आली आहे. मूळचा मुंबईचा रहिमुद्दीन आता पाकिस्तानात राहत आहे.

राजस्थानातून अटक केलेला जान मोहम्मदला रेल्वे ट्रॅक आणि बि-ज उडवण्याचे प्रशिक्षण पाकिस्तानमधून देण्यात आले होते, अशी माहिती आता दिल्ली पोलीसांच्या तपासात उघड झाली आहे. पाकिस्तानातून मोहम्मद रहिमुद्दीन एका कॉलिंग अ‍ॅपद्नारे त्याला हे प्रशिक्षण देत होता. रहिमुद्दीन हा मुळचा मुंबईचा आहे पण आता तो पाकिस्तानातून जानला हे प्रशिक्षण देत होता. अनिस इब-ाहिम, रहिमुद्दीनला सर्व निर्देश द्यायचा असेही तपासात उघड झाले आहे.

उत्तर प्रदेशातून दहशतवाद्यांच्या मास्टरमाईंडला अटक करण्यात आली आहे. नागपाडा भागातून संशयिताला अटक करण्याता आली आहे. मुंबई अढडने धडक कारवाई करत ही अटक केली आहे. दहशतवादी कट प्रकरणात मुंबई एटीएसने मोठी कारवाई केली. नागपाड्यातून संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेतले. झाकीर नावाचा संशयित दहशतवादी एटीएसने ताब्यात घेतला आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!