पालघर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीसाठी जोरदार मोर्चे बांधणी
मुंबई,
ओबीसींच आरक्षण रद्द झाल्यानंतर रिक्त झालेल्या पालघर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे . जिल्हा परिषदेत तील 15 तर जिल्ह्यातील विविध पंचायत समित्यांमधील 14 जागांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. या पोट निवडणुकांसाठी जिल्ह्यात सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली असून यामधील काही गट व गणांमध्ये मतदारसंघाबाहेरील उमेदवार इच्छुक असल्याने स्थानिकांमध्ये नाराजीच वातावरण आहे. त्यातच सर्व पक्षांनी ह्या सर्व जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असून जिल्ह्यात सर्वात जास्त चर्चेत आहे तो डहाणू तालुक्यातील वणई हा जिल्हा परिषदेचा गट.
या गटावर सर्वच राजकीय पक्षांच विशेष लक्ष असून सध्या सर्व राजकीय पक्षांची या गटासाठी अंतर्गत फिल्डिंग सुरू आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेचे माजी कृषी सभापती सुशील चूरी हे याच गटातून निवडून आले असून त्यांचे पद रिक्त झाल्याने सध्या शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित हे आपला मुलगा रोहित गावित यांच्यासाठी आग-ही असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे एक माजी आमदार ही दुसर्या पक्षात प्रवेश करून उमेदवारी मागण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. काँग-ेस राष्ट्रवादी शिवसेना भाजपा माकपा बहुआ या सर्वच पक्षाचे उमेदवार रिंगणात असल्याची जोरदार चर्चा आहे.परंतु जेथे रोहित गावित यांचं शिवसेनेकडून नाव पुढे येत असल्याने या गटातून स्थानिक नागरिक तसच स्थानिक शिवसैनिकांनीही तीव- नाराजी दर्शवली आहे.काही दिवसांपूर्वी मनोर येथील सायलेंट या रिसॉर्टवर शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या पार पडलेल्या बैठकीत रोहित गावित यांना वणई गटातून उमेदवारी देऊ नये म्हणून काही शिवसैनिकांनी वरिष्ठांसमोरच आग-ह धरल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे.
रोहित गावित हे राजकारणात फारसे सक्रिय नाहीत , राजकारणाचा फारसा अनुभव नाही . त्यातच स्थानिक उमेदवारास संधी देण्याची मागणी होत असल्याने रोहित गावित यांना उमेदवारी दिल्यास स्थानिक शिवसैनिकांची ही मनधरणी पक्षाची डोकेदुखी ठरणार आहे . त्यामुळे आपल्या हातात असलेली ही जिल्हा परिषदेची जागा शिवसेना राखण्यात यशस्वी होते का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.