टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अनिल कुंबळेचे नाव आघाडीवर!
नवी दिल्ली,
टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ समाप्त होणार आहे. ऑॅक्टोबरमध्ये टी-20 विश्वचषक स्पर्धेला सुरूवात होणार असून, अंतिम सामना 14 नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे. म्हणजे पुढील दोन महिन्यानंतर रवी शास्त्री हे भारतीय संघाचे प्रशिक्षक असणार नाहीत. तर, रवी शास्त्री नंतर भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी आता अनिल कुंबळे यांचे नाव पुन्हा एकदा जोरदार चर्चेत आले आहे.
आता पुन्हा एकदा भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अनिल कुंबळेना परत आणण्याच्या तयारीत बीसीसीआय आहे आणि त्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, आपल्या कार्यकाळाबाबत रवी शास्त्री यांनी एक वक्तव्य करत म्हटले आहे की प्रशिक्षकाच्या कार्यकाळात त्यांनी सर्व काही मिळवले, ज्यांची ते अपेक्षा बाळगून होते. त्यांनी हे देखील सांगितले की, भारतीय टीम जर टी-20 विश्वचषक जिंकली तर हे बाब त्यांच्या कार्यकाळात सोने पे सुहागा ठरेल. शास्त्रींनी द गार्डियनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की त्यांनी आपल्या कार्यकाळात सर्वकाही मिळवले.शास्त्री पुढे म्हणाले की, यामुळे मी असे मानतो कारण मी ते सर्व काही मिळवले, जे मला हवे होते. नंबर 1 च्या रुपात पाच वर्ष (टेस्ट क्रिकेटमध्ये), ऑॅस्ट्रेलियामध्ये दोनवेळा जिंकण्यासाठी, इंग्लडमध्ये जिंकण्यासाठी. या उन्हाळ्याच्या सुरूवातीस मी मायकल ऑॅर्थरटनशी बोललो होतो आणि म्हणालो होतो की, माझ्यासाठी हे अंतिम आहे. ऑॅस्ट्रेलियाला ऑॅस्ट्रेलियामध्ये हरवणे आणि कोरोना काळात इंग्लडमध्ये विजय मिळवणे. आम्ही इंग्लडवर 2-1 ने विजय मिळवला आणि ज्याप्रकारे लॉर्ड आणि ओवलवर खेळलो ते खास होते.
भारताने शास्त्रीच्या कार्यकाळात दक्षिण अफ्रिका, न्युझीलंड, ऑॅस्ट्रेलिया आणि इंग्लडमध्ये टी-20 मालिकेत विजय मिळवला. शास्त्रींनी सांगितले की, आम्ही जगातील प्रत्येक देशाला पांढर्या बॉलच्या क्रिकेट सामन्यामध्ये हरवले आहे, आम्ही जर टी-20 विश्वचषक जिंकलो तर हे सोने पर सुहागा होईलष्ठयापेक्षा जास्त काहीच नाही.
आपल्या विधानात रवी शास्त्रींनी म्हटले की, एक गोष्ट मी मानतो, आपल्या स्वागताला कधी उशीर करू नये आणि मी म्हणेल की, मी ज्या गोष्टीपासून बाहेर होऊ इच्छित होतो, त्याच्या संदर्भात मी खूप काही मिळवले आहे. ऑॅस्ट्रेलियाला हरवणे, कोरोनाकाळात इंग्लडमधील मालिकेच नेतृत्व करण्यासाठी? हे क्रिकेटमधील माझ्या चार दशकातील सर्वात समाधानकारक क्षण आहेत.