गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार्‍या वाहनांची तपासणी करुन घेण्याचे आवाहन

जालना,

जालना जिल्ह्यात दि. 19 सप्टेंबर 2021 रोजी श्री गणेश विसर्जन मिरवणुक काढण्यात येणार असुन त्या अनुषंगाने मिरवणुकीत सहभागी होणार्‍या वाहनांची तांत्रिक तपासणी करण्याच्या दृष्टीने सर्व वाहनांची विधीग्राह्य कागदपत्रे तपासुन व ज्या वाहनांची विधीग्राह्य कागदपत्रे नसतील अशा वाहनांना प्रमाणपत्र देण्यात येणार नाही. यामध्ये प्रामुख्याने तपासुण कर, विमा प्रमाणपत्र, रोड परवाना, चालक अनुज्ञप्ती, वायु प्रदुषण प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे तपासुन पहावीत. तसेच डिझेल टँक गळती, वाहनांचे ब-ेक्स याची काटेकोरपणे तपासणी करणे आवश्यक आहे.

मोटार वाहन निरीक्षक यु.व्ही. साळुंखे व मोटार वाहन निरीक्षक एन.पी.पाटील या अधिकार्‍यांकडुन वरील दिलेल्या सुचनांनुसार वाहनांची तपासणी करुन दि. 19 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 9.00 ते 12.00 आझाद मैदान जालना येथे व दुपारी 12.00 ते 3.00 अल्पबचत भवन मैदान, जालना येथे प्रमाणपत्र देण्यात येईल. अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!