निजामकालीन 150 शाळांचा पुनर्विकास करणार, मुख्यमंत्र्यांची औरंगाबादमध्ये घोषणा
औरंगाबाद,
निजामकालीन 150 शाळांचा पुर्विकास आपण करणार आहोत अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. याचेवेळी सुमारे स्वातंत्र्याच्या तेरा महिन्यानंतर मराठवाडा आपल्या संघराज्यात हिंदुस्तानमध्ये सामील झालोत. हे सामील होणे आसे-तसे नाही. तर, स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली अनेक जणांनी मराठवाडा मुक्त केला. ज्या प्रमाणे निजामासोबत मराठवाडा लढला, तसाच कोरोनासोबतही लढत आहे. असही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. गुरुवारी मराठवाडा मुक्तिसंग-ाम दिनी औरंगाबादेतील सिद्धार्थ उद्यानात मुख्य शासकीय ध्वजवंदनाचा कार्यक्रम त्यांच्या हस्ते झाला. त्यानंतर ते आयोजीत कार्यक्रमात बोलत होते.
’परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणार’
समृद्धी महामार्गामुळे मराठवाड्यात विकास होईल. भविष्यात हा मार्ग नांदेडला जोडला जाईल अस मुख्यमंत्री यावेळी म्हणाले आहेत. परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु केले जाईल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली आहे. हे सरकार कागदावर घोषणा करणारे नाही, त्याची पूर्तता करुन प्रत्यक्षात आणणारे आहे. आश्वासन पूर्ण केले तर अर्थ आहे, नुसते बोलघेवडे सरकार काही कामाचे नाही असा उल्लेखही त्यांनी यावेळी केला आहे.
’मराठवाड्याच्या मातीचे संस्कार जगापर्यंत पोहाचले पाहीजे’
घृष्णेश्वर मंदिराच्या सभामंडपाच्या विस्तारीकरणाचे काम सुरु करणार आहे, वेगळ्या प्रकारे बांधकाम करतोय. मंदिरे उघडा, त्यात जावेसे वाटले पाहिजे. मंदिरे स्वच्छ, सुंदर करणार आहोत अशी अप्रत्यक्ष टिका भाजपाच्या मंदीर मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली आहे. मराठवाडा ही संताची भूमी आहे. मराठवाड्यात संतपीठ स्थापन केले जाईल. त्यामध्ये संतांची शिकवण तिथे मिळणार आहे. हे विद्यापीठ झाले पाहिजे व मराठवाड्याच्या मातीचे संस्कार जगापर्यंत पोहाचले पाहीजेत अशी अपेक्षाती त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त मराठवाड्यातील निजामकालीन 150 शाळांचे पुनर्विकास करणार असल्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
आंदोलकांना ठाकरे शैलीत टोलेबाजी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठवाड्यात दाखल होणार असल्याचे जाहीर होताच एमआयएम आणि मनसे पक्षाने विभागाचा विकास केला नाही, असा आरोप करत आंदोलन केले. एमआयएमने गांधीगिरी आंदोलन करत उद्धव ठाकरे येणार त्या मार्गावर पुष्प उधळले, तर कुठे हातात फलक लावून निषेध व्यक्त केला. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या शैलीत उत्तर देत, असा विकास तुम्हालाच लखलाभ असो, तुम्हाला विकास काय असतो ते आता दिसेल असे प्रतिउत्तर आंदोलकांना त्यांनी दिले आहे.