मध्य प्रदेश : राजगडमध्ये जीप-अॅटोच्या धडकते 5 जणांचा मृत्यू
राजगड,
मध्य प्रदेशमधील राजगड जिल्ह्यात भरधाव वेगवाने धावणार्या जीपने अॅटोला धडक मारल्याने अॅटोमध्ये बसलेल्या पाच लोकांचा मृत्यू झाला तर एक गंभीरपणे जखमी झाला आहे.या अपघाताच्या घटनेवर राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दुख व्यक्त केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी व्यावरा रोडच्या पिपलिया चौकी भागातील काही लोक अॅटोने राजगडला येत होते त्याचवेळी भरधाव वेगात असलेल्या जीपने अॅटोला धडक मारली. या अपघातामध्ये पाच लोकांचा मृत्यू झाला आहे.
अपघातातील मृतकांमध्ये पन्ना लाल तंवर (70), प्रभूलाल तंवर (30), मोर सिंह (65), पार्वतीबाई (70), संतरा बाई (40) यांचा समावेश आहे. अपघातानंतर जीप चालक मात्र फरार झाला आहे.
सांगण्यात आले की या अपघातामध्ये पन्ना लाल आणि त्यांचा मुलगा प्रभुलाल यांचा मृत्यू झाला असून ते पेंशन काढण्यासाठी जात होते. तर मोर सिंह आणि पार्वती बाई दोघेही नातेवाईकांकडे अंत्यसंस्कारामध्ये सहभागी होण्यासाठी जात होते. अॅटो मोर सिंहचा मुलगा बबलू चालवत होता. या व्यतिरीक्त संतरा बाई ही आपल्या माहेरुन सासरी जात होती.
या अपघातावर मुख्यमंत्री चौहान यांनी दुख व्यक्त करत म्हटले की राजगडमधील नेवजच्या मुल्या पुला जवळ आज सकाळी अपघातामध्ये अनेक जणांचे निधन झाल्याची दुखद बातमी समजली. ईश्वर दिवंगत आत्म्यांना आपल्या श्रीचरणात स्थान देवो आणि कुटुंबाना दुख सहन करण्याची शक्ती देवो तसेच जखमीना लवकर स्वस्थ्य होण्यासाठी प्रार्थना करतो आहे.