नराधमांना कडक शिक्षा करून पिडीत कुटुंबियांस भरपाई द्यावी!
जालना,
सहा वर्षाच्या चिमुकलीवर पाशवी अत्याचार करून तीचा खून केल्याची संतापजनक घटना हैद्राबाद येथे घडली. या घटनेतील नराधमांना कडक शिक्षा करावी आणि पिडीत कुटुंबियांस भरपाई दिली जावी.अशी मागणी गोर सेनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष राठोड यांनी केली आहे.
या संदर्भात गुरूवारी ( ता. 16) गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण, प्रदेशाध्यक्ष संपत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष सुभाष राठोड यांनी एका शिष्टमंडळा समवेत जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत तेलंगणा च्या राज्यपाल श्रीमती तमीळ साई यांना पाठवलेल्या लेखी निवेदनात म्हंटले आहे की, स्वातंर्त्याच्या अमृत महोत्सवी वर्षानंतरही महिला, भगिनी सुरक्षित नाहीत. शासन वन्यप्राण्यांना सुरक्षा देते मात्र आदिवासी पूर्णपणे दुर्लक्षित आहेत. असे निवेदनात नमूद करण्यात आले. तेलंगणा ची राजधानी हैद्राबाद येथील मध्यवस्तीत सिंगारेनी कॉलनी परिसरात सहा वर्षाच्या चिमुकलीवर नराधमांनी पाशवी अत्याचार करून तीचा खून केला. मानवी र्हदय पिळवटून टाकणार्या या संतापजनक घटनेतील नराधमांना कडक शिक्षा करावी, पिडीत कुटुंबियांस शासनाने तात्काळ पन्नास लाखांची नुकसान भरपाई देऊन कुटुंबातील एका सदस्यास शासकीय सेवेत समावून घ्यावे. येत्या सात दिवसांत कारवाई न झाल्यास गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण, प्रदेशाध्यक्ष संपत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यातील जिल्हा कचेरी समोर आंदोलन केले जाईल. असा इशारा लेखी निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष सुभाष राठोड, तालुकाध्यक्ष बाळू राठोड ,संदीप जाधव, श्याम आढे, घनश्याम आढे, शंकर राठोड, रवी पवार ,मुकेश चव्हाण, विकास राठोड ,संदीप चव्हाण, अजय राठोड, प्रकाश राठोड यांच्या स्वाक्षर्या आहेत.