आयुष्य क्षणभंगुर झाल्याने उपभोगाची मानसिकता वाढली परिणामी बांधकाम व्यवसाय तेजीत : वास्तु विशारद प्रमोद माळी

दैनिक महाराष्ट्र सारथी जळगाव प्रतिनिधी

” कोरोना महामारीमुळे आयुष्याची क्षणभंगुरता समजल्याने उपभोगाची मानसिकता वाढली .परिणामी बांधकाम व्यवसाय तेजीत आला ” असे प्रतिपादन सुप्रसिद्ध वास्तु विशारद प्रमोद माळी यांनी केले .

राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त भारतरत्न डॉ . ए .पी .जे . अब्दुल कलाम पुस्तक भिशी तर्फे दि . १५ सप्टेंबर २०२१ रोजी भिशीतील ग्रंथप्रेमी ,लेखक परिवारातील सृजनशील अभियंत्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना प्रमोद माळी बोलत होते .कोरोना महामारीचा उद्रेक व शासकीय निर्बंध लक्षात घेऊन सत्कार कौटुंबिक वातावरणात अनौपचारिकपणे साजरा करण्यात आला.

आरोग्यवर्धिनी केंद्राचे राज्यस्तरीय प्रमाणित मॉडेलचे जनक अभियंता संजय भावसार यांचा शाल ,श्रीफळ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुस्तक देऊन चित्रकार सुनिल दाभाडे यांच्या हस्ते हृदय सत्कार करण्यात आला . सुप्रसिद्ध आर्किटेक्ट प्रमोद माळी यांचा सत्कार शिक्षक सुदाम बडगुजर यांच्या हस्ते करण्यात आला . मध्य रेल्वेतील ज्येष्ठ अभियंता तथा सुप्रसिद्ध कथालेखक दीपक तांबोळी यांचा सत्कार चित्रकार सुनिल दाभाडे आणि क्रिएटीव्ह समुहाचे अर्धव्यु अभियंता मिलींद काळे यांचा सत्कार अर्थव प्रकाशनाचे संचालक युवराज माळी यांच्या हस्ते करण्यात आला .

सत्कारा प्रसंगी भारतरत्न डॉ. ए . पी . जे . अब्दुल कलाम पुस्तक भिशीचे जिल्हा प्रमुख विजय लुल्हे यांनी सत्कारार्थी अभियंत्यांची अनौपचारीक मुलाखत घेतली . सुप्रसिद्ध वास्तुविशारद प्रमोद माळी पुढील मार्गदर्शनपर संवांदात म्हणाले की , ” कोविड – १९ महामारीमुळे लोकांची मानसिकता बदलल्याने बांधकाम क्षेत्रात तेजी आली आहे ! पूर्वी पालक मंडळींचा पुढच्या पिढीसाठी भवितव्याच्या दृष्टीने आर्थिक तरतूद करून ठेवण्याचा कल होता . मात्र आता कोरोनामुळे आयुष्य क्षणभंगुर झाल्याच्या भितीग्रस्ततेने उद्याचा भरवसा कुणाला वाटत नाही . परिणामी आज आहे त्या परिस्थितीत आयुष्याचा उपभोग घेऊन स्वप्नपूर्तीने जगून घेण्याची महत्वाकांक्षा प्रबळ झाल्याने बांधकाम क्षेत्रात अकस्मात तेजीच पर्व आलय . ” असे माळी यांनी अनुभवांती सकारात्मक विचार मांडले

वृक्ष संवर्धन काळाची गरज

अभियंता मिलींद काळे यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या . काळे म्हणाले की, ” कोरोनाच्या प्रभावाने खाजगी कामे कमी झाली . बांधकामाच्या मटेरीयलचे भाव वाढल्याने सामान्यांना दिलासा नाहीच . तथापि मानव्यता भावनेतून क्रिएटीव्ह गृपतर्फे कोरोना काळात बेरोजगार झालेल्या बिगारी कामगार कुटूंबियांना अन्नधान्य व किराणा साहित्याचे मोफत वितरण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले . तसेच क्रिएटिव्ह गृपतर्फे जिल्हास्तरीय शिबीरे, भव्य सेमिनार घेऊन एका व्यासपिठावर व एका छताखाली बांधकाम क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कंपन्यांची उत्पादने, अत्याधुनिक बांधकाम तंत्रज्ञान, रास्त किंमतीत विक्री सामान्य ग्राहकांना उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले . भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांच्या रचनात्मक विकासाने प्रेरीत होऊन क्रिएटीव्ह गृपची दमदार वाटचाल व भविष्यकालीन ग्राहक हिताच्या योजनाही त्यांनी संक्षेपाने सांगितल्या.
सत्कारा प्रसंगी मातोश्री उषा काळे, शितल काळे , रसिका काळे , गार्गी काळे, प्रा .वंदना महाजन , नचिकेत महाजन, कल्याणी महाजन, रागिणी तांबोळी, प्रतिक तांबोळी, उत्कर्षा तांबोळी ,स्वाती भावसार , ऋचिका भावसार ,आदिती भावसार उपस्थित होते . कार्यक्रमाची प्रेरणा पुस्तक भिशीचे पालक तथा मार्गदर्शक निवृत्त माध्यमिक शिक्षणाधिकारी नीळकंठ गायकवाड, निवृत्त शिक्षण उपसंचालक (प्राथमिक ) कवी शशिकांत हिंगोणेकर, निवृत्त माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर, जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, केंद्रप्रमुख तथा कवी अरुण वांद्रे, मुख्याध्यापक नितिन धांडे, गझलकार आशा सोळुंके यांनी दिली .

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!