उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी आपच्या शंभर उमेदवारांची यादी प्रसिध्द
लखनऊ,
उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी होणार्या विधानसभा निवडणुकीवरुन राजकिय वातावरण आता जोरदार तापू लागले आहे. या दरम्यान उमेदवारांना तिकीट वाटपामध्ये आम आदमी पार्टी (आप) ने एक पाऊल पुढे टाकत बाजी मारली आहे. इतर राजकिय पक्ष एका बाजूला तिकीट वाटपावरुन मंथन करताना दिसत आहेत. तर आपने बुधवारी आपल्या शंभर उमेदवारांची पहिली यादी प्रसिध्द केली आहे.
आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी प्रसिध्द करणारा आप पहिला पक्ष ठरला आहे. आपचे खासदार संजय सिंहनी सांगितले की जर उमेदवार पक्षाच्या धोरण आणि कार्यक्रमानुसार नसतील तर काही उमेदवारांना नंतर बदले जाऊ शकते आहे.
आपने लखनऊ, सीतापूर, सुलतानपूर, प्रतापगड, रामपूर, कानपूर, प्रयागराज, हरदोई, गाझियाबाद, आग-ा, अलीगड, अमेठी, बहराइच, बाराबंकी, बलियासह अन्य जागांवारील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.
मनोरंजक गोष्ट म्हणजे एकटया लखनऊमध्ये आपचे दोन उमेदवार राजीव बख्शी आणि नदीम अशरफ जायसी हे माजी कॉगेसी नेते आहेत. त्यांनी मागील वर्षी काँग-ेस पक्षाला सोडले होते.