आयएसआय संघटनेचा अंडरवर्ल्डच्या मदतीने भारतात बॉम्बस्फोट घडविण्याचा डाव
हैदराबाद
भारतामध्ये सणासुदीचे वातावरण आहे, दुसरीकडे काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याने राजकीय वातावरण तापले आहे. अशा परिस्थिती दहशतवादी हे काही राज्यांमध्ये बॉम्बस्फोट घडविण्याच्या तयारीत होते. पाकिस्तानमधील आयएसआय संघटनेने अंडरवर्ल्डच्या मदतीने कट रचल्याचा पोलिसांकडून दावा करण्यात येत आहे.
अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा घेतल्यानंतर आयएसआयने लष्कर, जेईएम आणि अलबद्र या दहशतवाद्यांबरोबर नवीन दहशतवादाचा गट तयार केला. सुत्राच्या माहितीनुसार जुलैपासून 200 दहशतवादी भारतामध्ये पाठविण्यासाठी दहशतवादी संघटनांकडून तयारी सुरू होती. पाकिस्तानचे सैन्यदल हे जम्मू काश्मीरमध्ये अफगाण आणि पश्तून दहशतवाद्यांच्या मदतीने हल्ले घडविण्याच्या तयारीत आहे.
पाकिस्तानने भारतात दहशतवादी हल्ला घडविण्याचा कट रचल्याचे मंगळवारी उजेडात आले. महाराष्ट्र, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमधून सहा दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. दिल्ली पोलिसांचे स्पेशल सेलचे उपायुक्त प्रमोद कुमार कुशवाहा यांच्या माहितीनुसार स्पेशल सेलने पाकिस्तानचे समर्थन असलेल्या दहशतवादी मॉड्यूलचा भंडाफोड झाला आहे. ओसामा आणि जीशान कमर या दहशतवाद्यांनी पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतले आहे. इतर चार दहशतवादी मोहम्मद अबु बकर, जान मोहम्मद शेख, मोहम्मद अमीर जावेद आणि मूलचंद लाला यांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
दिल्ली पोलीस स्पेशल आयुक्त नीरज ठाकूर यांच्या माहितीनुसार ओसामा आणि जीशान कमर हे एप्रिलमध्ये मस्कतमध्ये गेले होते. मस्कतमधील सागरीमार्गावरून ते पाकिस्तानात गेले. त्यांना एका फार्महाऊसमध्ये स्फोटके तयार करणे आणि एके-47 चालविण्याचे 15 दिवस प्रशिक्षण देण्यात आले. दहशतवाद्यांना नवरात्र आणि रामलीला या सणांच्या वेळी गर्दीत आयईडी स्फोट करण्याच्या सूचना होत्या. दिल्ली पोलीस स्पेशल आयुक्त यांच्या माहितीनुसार आयएसआयने दाऊद इब-ाहिमच्या टोळीच्या मदतीने हल्ला करण्याचा कट रचला होता.
दाऊदचा भाऊ अनीस इब-ाहिम दहशतवाद्यांना करत होता ऑॅपरेट-
नीरज ठाकूर म्हणाले, की गुप्तचर विभागाकडून विविध राज्यांमध्ये दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. या ऑॅपेरशनमध्ये सकाळपासून काही राज्यांमध्ये छापे टाकले होते. सर्वात प्रथम समीर या आरोपीला अटक केली आहे. त्यानंतर दिल्लीमधून दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. युपी एटीएसच्या मदतीने तीन जणांना उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आली आहे. दोन आरोपी हे पाकिस्तानमध्ये गेले होते. त्यांनी पाकिस्तानमध्ये बंदूक चालविणे आणि स्फोटक तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले. त्यांच्यासमवेत सुमारे 12 बांगलादेशी नागरिकांनीही प्रशिक्षण घेतले आहे. सीमेजवळ दोन वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या होत्या. पहिल्या टीमला दाऊदचा भाऊ अनीस इब-ाहिम ऑॅपरेट करत होता. या ऑॅपरेशनला अनीस आर्थिक रसद पुरवित होता.
दाऊदच्या हस्तकांनी भारतात पोहोचविली हत्यारे
दहशतवाद्यांकडून रेकीला सुरुवात करण्यात आली नव्हती. अटकेमध्ये जीशान आणि ओसामा यांचा समावेश आहे. जान मोहम्मद शेख हा महाराष्ट्रामधील रहिवाशी आहे. तर ओसामा हा जामिया नगरचा रहिवाशी आहे. मूलचंद हा रायबरेली, जीशान कमर हा अलाहाबाद तर अबू बकर हे दिल्लीमध्ये राहणारा होता. त्याशिवाय अमीर जावेद हा लखनौचा रहिवाशी आहे. दाऊदच्या हस्तकांनी भारतात हत्यारे पोहोचविली होती. त्यांना पाकिस्तानमधून हँडल करण्यात येत होते.
पुलावामाच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने दहशतवादी संघटनेला टीआरएफ हे नाव दिले. या टीआरएफमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांचा समावेश करण्यात आला. टीआरफने हंदवाडा एन्काउन्टरच्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. अमेरिकेमधील थिंक टँक हडसन इन्स्टिट्यूटने आयएसआयच्या इशार्यावर पाकिस्तानमधील दहशतवादी हे खलिस्तानी दहशतवाद्यांच्या संपर्कात येण्याच्या संपर्कात येऊ शकतात.
ही आहेत पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना-
हिजबुल मुजाहिदीन- हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेची स्थापना 1989 मध्ये काश्मीर फुटिरतावादी मुहम्मद एहसान डार याने स्थापन केली. या दहशतवादी संघटनेचा प्रमुख सैय्यद सलाउद्दीन हा पाकिस्तानमध्ये बसून संघटना चालवितो. या दहशतवादी संघटनेला आयएसआयकडून आर्थिक रसद पुरविण्यात येते. ही संघटना सैनिकांना टार्गेट करते. ही दहशतवादी संघटना जर्मन बेकरी, चिन्नास्वामी स्टेडियम, जामा मशीद आणि मुंबईवरील हल्ल्याला जबाबदार आहे.
जैश-ए-मोहम्मद – मौलाना मसूद अझहरने फेब-ुवारी 2000 मध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेची स्थापना केली. त्यानंतर भारतीय संसदेवर हल्ला घडवून आणला. या दहशतवादी संघटनेने भारतात अनेक हल्ले घडवून आणले आहेत. जानेवारी 2002 मध्ये संघटनेचे नाव बदलून खुद्दाम उल-इस्लाम करण्यात आले. पुन्हा या दहशतवादी संघटनेचे नाव बदलल्याची चर्चा आहे. मसूद अझहरचा भाऊ मुफ्ती अब्दुल रऊफ असगर हा सध्या जैश ए मोहम्मदचे काम सांभाळत असल्याचे बोलले जाते.
लष्कर-ए-तोयबा- ही दहशतवादी संघटना पाकिस्तानमधील लाहोरजवळी मुरीदके आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षण देते. जैश ए मोहम्मद यांच्या मदतीने लष्कर-ए-तोयबाने भारतामध्ये अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणले आहेत. लाहोर विद्यापीठात अभियंत्रा प्राध्यापक असलेल्या हाफिज सय्यदने 1980 मध्ये लष्कर-ए-तोयबाची स्थापना केली आहे. 2005 नंतर ही संघटना जमात-उद-दावाने सक्रिय झाली आहे. मुंबईमधील 2008 च्या हल्ल्यातही लष्कर-ए-तोयबाचे नाव समोर आले होते.
अल बद्र- पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये अल बद्र ही दहशतवादी संघटना ही पख्तूनख्वामध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षण देते. खैबर पख्तूनख्वामध्ये भारतीय वायुदलाने एअर स्ट्राईक केला होता. येथील दहशतवाद्यांचे अड्डे पाकिस्तानी लष्कराकडून चालविले जाता.
अलकायदा- अलकायदा म्हणजे सुन्नी इस्लामिक आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेने 3 सप्टेंबर 2014 पासून भारतीय उपखंडात कारवाया करण्यास सुरुवात केली आहे. सुत्राच्या माहितीनुसार अलकायदा आणि आयएएस नेटवर्क हे अनेक राज्यांमध्ये पसरलेले आहे.
याव्यतिरिक्त लष्कर ए मुस्तफा, अल बर्क, अल जेहाद, जम्मू कश्मीर लिबरेशन आर्मी, अल उमर मुजाहिदीन, महाज ए आजादी, इस्लामी जमात ए तुलबा, तहरीके हुर्रियत ए कश्मीर, मुस्लिम मुजाहिदीन अशा दहशतवादी संघटनांना पाकिस्तानकडून खतपाणी मिळत आहे.