पेट्रोल, डिझेलच्या किमतीत किमान 20-25 रुपयांची घट शक्यता; केंद्र सरकार हा निर्णय घेणार?
नवी दिल्ली,
पेट्रोल-डिझेलच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. पेट्रोलने तर कधीच 100 रुपये लिटरचा आकडा ओलांडला असून 108 ते 109 रुपयांच्या दरम्यान प्रतिलिटर पेट्रोलचे दर गेले आहेत. वाढलेल्या या इंधनाच्या दरानं सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. मात्र, याबाबत एक दिलासादायक बातमी असून लवकरच पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखालील उएऊ परिषदेची शुक्रवारी लखनऊमध्ये बैठक होणार आहे. जीएसटी काऊन्सिलच्या या 45 व्या बैठकीत पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यासंबंधी विचार केला जाईल. याबाबत सकारात्मक घडामोडी घडल्यास पेट्रोल जवळपास 75 रुपयांपर्यंत खाली येऊ शकते.
मात्र, पेट्रोल आणि डिझेल वरील कर हे राज्याच्या प्रमुख उत्पादनाचे साधन असल्यानं राज्य सरकार याला विरोध करण्याची शक्यता आहे. जीएसटीच्या कक्षेत पेट्रोल आणि डिझेल आल्यास महागाईतून सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) वरील मंत्र्यांचे पॅनेल पेट्रोलियम उत्पादनांवर राष्ट्रीय पातळीवर एक कर लावण्याचा विचार करू शकते. मात्र, यावर राज्य सरकारांचे प्रतिनिधी काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे. राज्य सरकारांची भूमिका योग्य राहिल्यास इंधन दर कपातीचा मोठा निर्णय होऊ शकतो.
पेट्रोलियम उत्पादन उएऊ च्या कक्षेत आणलं गेले तर केंद्र आणि राज्याच्या महसूलात जीडीपी केवळ 0.4 टक्के म्हणजे 1 लाख कोटी रुपये कमी होतील. जर पेट्रोल-डिझेल उएऊ च्या कक्षेत आणलं गेले तर देशभरात पेट्रोल 75 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 68 रुपये प्रति लीटर या दराने विक्री केले जातील, असे गेल्या मार्च महिन्यात एँघ् च्या आर्थिक सर्वेक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या अहवालात सांगितले होते.
जीएसटी कौन्सिलची 45 वी बैठक 17 सप्टेंबर रोजी लखनऊमध्ये होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखाली जीएसटी कौन्सिलची बैठक होणार आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर जीएसटी परिषदेची ही बैठक ऑॅफलाईन स्वरुपात असेल. जीएसटी परिषदेची शेवटची बैठक 12 जूनला व्हिडीओ कॉन्फन्सिंगद्वारे झाली होती. त्यामध्ये कोरोना उपचारांसाठी लागणार्या साहित्यावरील कर 30 सप्टेंबरपर्यंत कमी करण्यात आला होता. आता 17 तारखेला होणाऱ्या बैठकीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.