राज्येकेंद्रशासित प्रदेशातल्या कोविड 19 लस उपलब्धतेबाबत अद्ययावत माहिती
नवी दिल्ली,
राज्येकेंद्रशासित प्रदेश आणि खाजगी रुग्णालयांकडे अद्याप 4.62 कोटी पेक्षा जास्त मात्रा उपलब्ध, 1.8 कोटीपेक्षा जास्त मात्रा पुरवठ्याच्या मार्गावर
कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाची देशभरात व्याप्ती आणि गती वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे. कोविड-19 सार्वत्रिक लसीकरणाचा नवा टप्पा 21 जून 2021 पासून सुरु झाला. लसींची अधिक उपलब्धता, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीकरणाचे उत्तम नियोजन करण्याच्या दृष्टीने लस उपलब्धतेवर आधीच दृष्टीक्षेप आणि प्रवाही लस पुरवठा साखळी याद्वारे लसीकरण अभियानाला अधिक गती देण्यात आली आहे.
देशव्यापी लसीकरण अभियानाचा भाग म्हणून केंद्र सरकार, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीच्या मोफत मात्रा पुरवत आहे. कोविड-19 लसीकरण अभियानाच्या सार्वत्रिकीकरणाच्या नव्या टप्यात केंद्र सरकार, देशातल्या लस उत्पादकांकडून उत्पादित 75म लसी खरेदी करून त्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत पुरवत आहे.
केंद्र सरकारने आतापर्यंत सर्व स्त्रोताद्वारे 74.25 कोटींपेक्षा जास्त (74,25,94,875) लसींच्या मात्रा राज्येकेंद्रशासित प्रदेशांना पुरवल्या आहेत. आणखी 1.8 कोटी (1,80,83,000) मात्रा पुरवठ्याच्या मार्गावर आहेत.
याशिवाय लसीच्या 4.62 कोटी पेक्षा जास्त (4,62,75,955) शिल्लक आणि वापरलेल्या नाहीत अशा मात्रा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आणि खाजगी रुग्णालयांकडे उपलब्ध आहेत.