47 व्या जी-7 शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार सहभागी

नवी दिल्ली, 10 जून 2021

ग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 12 आणि 13 जून रोजी, जी-7 शिखर परिषदेच्या आऊटरिच सेशन्स म्हणजेच जनसंपर्क सत्रात आभासी स्वरूपात सहभागी होणार आहेत. सध्या इंग्लंड जी-7 परिषदेच्या अध्यक्षस्थानी असून, भारतासह,ऑस्ट्रेलिया, कोरिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांना पाहुणे देश म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. ही बैठक मिश्र स्वरूपात होणार आहे. 

या परिषदेची संकल्पना ‘बिल्ड बॅक बेटर” म्हणजेच ‘उत्तम पद्धतीने पुन्हा उभारणी’ अशी आहे. ब्रिटनने आपल्या अध्यक्षपदासाठी चार प्राधान्यक्रम निश्चित केले आहेत. ही चार क्षेत्रे म्हणजे, कोरोनाविषाणूपासून संपूर्ण जगाला मुक्त करतानांच भविष्यातील महामारीशी लढा देण्यासाठी अधिक ताकद निर्माण करणे; मुक्त आणि वाजवी व्यापाराला प्रोत्साहन देत, सर्वांचे भविष्य अधिक समृद्ध करण्यासाठी प्रयत्न; हवामान बदलाच्या समस्येची हाताळणी आणि पृथ्वीची जैवविविधता जपणे, आणि चौथे, सामाईक मूल्ये आणि मुक्त समाजाच्या उभारणासाठी प्रयत्न करणे. या परिषदेत,सर्व जागतिक नेते, महामारीपासून जगाला मुक्त करण्यासाठी आपापले विचार मांडणार आहेत, यात आरोग्य आणि हवामान बदल या मुद्द्यांवर विशेष भर असेल. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी दुसऱ्यांदा जी-7 शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. 2019 साली, G7 फ्रांसच्या अध्यक्षांनीही भारताला आमंत्रित केले होते. बिअरीत्स येथे झालेल्या या परिषदेत, ‘सदिच्छा भागीदार’ म्हणून पंतप्रधान ‘हवामान, जैव-विविधता आणि महासागर’ आणि ’डिजिटल परिवर्तन’ अशा दोन सत्रांमध्ये सहभागी झाले होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!