मुंबईकरांनो सावधान; 23 हजारांहून अधिकांना लस घेऊनही कोरोनाची लागण
मुंबई
राज्यात कोरोनाचा धोका अजून पूर्णपणे टळलेला नाही. मुंबईत देखील दररोज कोरोनाचे रूग्ण सापडत आहेत. यामध्ये लस घेतलेल्या व्यक्तींना देखील कोरोनाची लागण होत असल्याचं समोर आलं आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये 23 हजारांहून अधिक व्यक्ती ज्यांनी लस घेतली त्यांना पुन्हा कोरोना झाल्याचं समजतंय.
मुंबईत 23239 लसवंतांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये दोन्ही डोस घेऊनही 9000 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर पहिला डोस घेऊन कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या 14239 इतकी आहे. मुख्य म्हणजे, लस घेऊनही कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण हे 60 वर्षांवरील व्यक्तींमध्ये सर्वाधिक आहे.
18 ते 44 वयोगटात
पहिला डोस घेऊन कोरोनाची लागण- 4420
दुसरा डोस घेऊन कोरोनाची लागण- 1835
45 ते 59 वयोगट
पहिला डोस घेऊन कोरोनाची लागण-4815
दुसरा डोस घेऊन कोरोनाची लागण- 2687
60 वर्षांवरील
पहिला डोस घेऊन कोरोनाची लागण-5004
दुसरा डोस घेऊन कोरोनाची लागण- 4479
तर दुसरीकडे गेल्या सहा महिन्यांमध्ये एकंही लस न घेतलेल्या दोन तृतीयांश लोकांना आयसीयूमध्ये भरती करण्याची वेळ आली. यामध्ये यापैकी 93 टक्के लोकं म्हणजेच 576 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. लस घेतलेल्या आणि लस न घेतलेल्या व्यक्तींच्या मृत्यूच्या प्रमाणाबाबत केलेल्या अभ्यासात ही बाब उघड झालीये. ही आकडेवारी पाहिल्यावर लस किती अत्यावश्यक आहे हे लक्षात येईल.
मृत्यूचं प्रमाण
एकंही लस न घेतलेल्या व्यक्ती- 93.05
एक लस घेतलेल्या व्यक्ती- 5.97
दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्ती- 0.96