संयुक्त राष्ट्र महिलांच्या कार्यकारी निदेशकपदी बहौसची नियुक्ती
संयुक्त राष्ट्र,
संयुक्त राष्ट्र महिलांच्या नवीन कार्यकारी निदेशक म्हणून जॉर्डनच्या सीमा सामी बहौस यांच्या नियुक्ती संबंधीची घोषणा संयुक्त राष्ट्र (यूएन) चे महासचिव अॅटोनियो गुटेरेस यांनी केली.
यूएन महासचिवांच्या कार्यालयाद्वारे प्रसिध्द एका निवेदनानुसार जॉर्डनच्या बहौस 2016 पासून संयुक्त राष्ट्रामध्ये स्थायी प्रतिनिधी आहेत व त्या फुमजिले म्लाम्बो न्गकुका यांची जागा घेतील.
एका निवेदनात सांगण्यात आले की महिला आणि मुलींसाठी एक चॅम्पियन, लैंगिक समानता आणि युवा सशक्तीकरणा बरोबरच गुणवत्तापूर्ण शिक्षण, गरीबी निर्मुलन आणि समावेशी शासनासाठी एक सखोल बाजू मांडणार्या, जमिनीस्तर, राष्ट्रीय , क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावर महिला सशक्तीकरण आणि अधिकारांना पुढे नेणे, भेदभाव व हिंसेच्या विरोधात आवाज उठविणे आणि सतत विकासाच्या लक्ष्यांना प्राप्त करण्यासाठी सतत सामाजीक-आर्थिक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी विशेषतज्ञा बरोबर मिळून मागील 35 वर्षा पासून अनुभव मिळविला आहे.
बहौसानी 2012 ते 2016 पर्यंत यूएन विकास कार्यक्रमामध्ये अरब राज्य क्षेत्रीय ब्यूरोच्या सहाय्यक प्रशासक आणि निदेशकाच्या रुपात काम केले आहे. 2008 ते 2012 पर्यंत अरब राज्यांमध्ये लीग सहाय्यक महासचिव आणि सामाजीक विकास क्षेत्राच्या प्रमुखाच्या रुपात काम केले आहे.
त्यांनी 2005 ते 2008 पर्यंत उच्च मीडिया परिषेच्या अध्यक्षाच्या रुपात तसेच जॉर्डनमध्ये दोन मंत्री पदांवर आणि 2003 ते 2005 पर्यंत किंग अब्दुल्ला द्वितीयांचे सल्लागारांच्या रुपात काम केले आहे.
त्या 2001 ते 2003 पर्यंत रॉयल हाशमाइट कोर्टच्या मीडिया सल्लागार आणि संचार निदेशकही होत्या. 2000 ते 2001 पर्यंत किंग हुसैन फाउंडेशनच्या कार्यकारी निदेशक आणि 1998 ते 2001 पर्यंत नूर अल हुसैन फाउंडेशनच्या कार्यकारी निदेशकही राहिल्या होत्या.
बहौसनी यूनिसेफ आणि अनेक संयुक्त राष्ट्र नागरीक समाज संघटनां बरोबरही काम केले आहे आणि जॉर्डनच्या विविध विद्यापीठांमध्ये विकास आणि संचार विषय शिकविला आहे.
त्यांनी अमेरिकेतील इंडियाना विद्यापीठातून जनसंचार आणि विकासामध्ये पीएचडी, इंग्लंडच्या अॅसेक्स विद्यापीठातून साहित्य आणि नाटकमध्ये मास्टर ऑफ आर्टस आणि जॉर्डन विद्यापीठातून इंग-जी साहित्यामध्ये पदवी प्राप्त केली आहे.