उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्ष 15 सप्टेंबरला संसद टीव्हीचे संयुक्तपणे उद्घाटन करणार
नवी दिल्ली,
उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती एम वेंकैया नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, संसद भवनाच्या मुख्य कमिटी रूम मध्ये 15 सप्टेंबरला संध्याकाळी 6 वाजता संसद टीव्हीचे संयुक्तपणे उद्?घाटन करणार आहेत. आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनी, संसद टीव्हीचे उद्?घाटन होणार आहे.
संसद टीव्ही विषयी
लोकसभा टीव्ही आणि राज्यसभा टीव्ही विलीनीकरणाचा निर्णय फेब-ुवारी 2021 मधेच घेण्यात आला होता. मार्च 2021 मध्ये संसद टीव्ही च्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली होती. संसद टीव्हीच्या कार्यक्रमांची प्रामुख्याने 4 वर्गात विभागणी करण्यात येणार आहे- संसद आणि लोकशाही संस्थांचे कामकाज, प्रशासन आणि योजनाधोरणे यांची अंमलबजावणी, इतिहास आणि भारताची संस्कृती आणि चालू घडामोडी.