पशूंच्या कल्याणा प्रती अनुष्काच्या समर्पणाची मी प्रशवंसा करतो – कोहली

मुंबई,

विराट कोहली फाउंडेशनने येथील मड, मलाडमध्ये आवारा पशुंसाठी एक ट्रॉमा आणि रिहब सेंटरचे उद्घाटन केले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला विराट कोहलीने म्हटले होते की तो मुंंबईमध्ये दोन पशू देखभाल सुविधांना स्थापीत करणार आहे.

कोहलीने आपली पत्नी अनुष्का शर्माला शहरातील आवारा पशूंच्या समोर येणार्‍या अडचणीना पाहण्याचे श्रेय दिले. अभिनेत्री अनुष्काने अनेक वेळा पशूंच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या अधिकाराच्या प्रती आपले समर्थन दिले आहे.

अनुष्काची पशूंच्या प्रति असलेल्या दिवानगीने प्रेरित होऊन कोहली आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून आवारा पशूंच्या मदतीसाठी संधी शोधत होता.

कोहलीने प्रसिध्द निवेदनात म्हटले की मी पशूंच्या कल्याणा प्रती अनुष्काच्या समर्पणाची प्रशवंसा करतो आहे आणि मी तिच्याकडून प्रेरणा घेतली आहे. आपल्या शहरातील आवारा पशूंसाठी एक सुरक्षीत जागा बनविणे आमचे स्वप्न बाहे. आम्हांला ही घोषणा करताना खूप आनंद होत आहे की सेंटर तयार आहे आणि या चांगल्या पुढकाराच्या माध्यमातून परिवर्तन येण्याची आशा आहे.

या सेंटरमध्ये जखमी आवारा पशूंवर उपचार केला जाईल आणि दहा विशेषतज्ञांची एक टिम विवाल्डिस अ‍ॅनिमल हेल्थ आणि व्हॉयस ऑफ स्ट्रे अ‍ॅनिमल्सच्या मदतीने मोहिम चालविण्यासाठी प्रभारी असेल.

या दरम्यान विवाल्डिस अ‍ॅनिमल हेल्थचे संस्थापक आणि सीईओ कुणाल खन्नानी म्हटले की आम्ही 21 एप्रिलला पहिल्यांदा विराट कोहली फाउंडेशन आणि आवाज बरोबर आपल्या सहभागाची घोषणा केली होती आणि पूर्ण टिमने हे सुनिश्चित करण्यासाठी अथक प्रयत्न केले की आम्ही फक्त पाच महिन्यानंतर आपल्या पहिल्या ट्रॉमा अँड रिहेब सेंटरसह तयार असूत. मी अनुष्का आणि कोहलीचे खूप आभारी आहे की त्यांनी आवारा पशूंना सतत समर्थन दिलेे. कारण आम्ही आगामी काळामध्ये अजून काही पुढकारांसह आपल्या जोडण्याला पुढे नेणार आहोत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!