ऑस्ट्रेलिया विरुध्द खेळण्यासाठी आम्ही थोडे जास्त उत्साहित असतोत – मंधाना
सिडनी,
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाच्या विरुध्द खेळण्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडू थोडे जास्त उत्साहित असता असे मत भारतीय महिला संघातील फलंदाज स्मृति मंधानाने व्यक्त केले.
भारत व ऑस्ट्रेलिया महिला किकेट संघात तीन एकदिवशीय, तीन टि-20 आणि एकमेव कसोटी सामन्याची मालिका 21 सप्टेंबर पासून सुरु होत आहे. या मालिकेची सुरुवात एकदिवशीय सामन्यांच्या मालिके पासून सुरु होत आहे.
मंधानाने स्कूप पोडकास्टला सांगितले की आम्ही सर्व ऑस्ट्रेलियाच्या विरुध्द खेळणे पसंत करतोत कारण हा जगातील सर्वश्रेष्ठ संघ आहे आणि खूप प्रतिस्पर्धीही आहे. ज्यावेळी ऑस्ट्रेलिया बाबत बोलायचे तर आम्ही थोडे जास्त उत्साहित असतोत कारण आॉस्ट्रेलिया संघाचा स्तर काही असाच आहे.
तिने म्हटले की ऑस्ट्रेलियातील खेळपट्टीवर चेंडूत उसळतो (बाउंस) आणि माझ्या मते येथे सर्वजण फलंदाजी करणे पसंत करतात. कोणीही तुम्हांला हे म्हणणार नाही की त्या ऑस्ट्रेलियामध्ये फलंदाजी करु इच्छित नाहीत.
मंधानाने म्हटले की मागील वर्षी टि-20 विश्व कपच्या अंतिममध्ये झालेल्या पराभवानंतर भारतीय खेळाडूनी सुधार केला आहे आणि त्यांना ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या मालिकेत चांगले करण्याचा विश्वास आहे.
मालिका सुरु होण्याच्या आधी दोनीही संघामध्ये 18 सप्टेंबरला बि-स्बेनमध्ये सराव सामना होईल. मंधानाने म्हटले की संघाने स्वत:ला चांगल्या प्रकारे विकसीत केले असून टि-20 विश्व कप नंतर कोरोनाचा ब-ेक खूप मोठा होता आणि अनेक खेळाडूंना त्यांच्या खेळाला चांगल्या प्रकारे समजण्याची संधी मिळाली.
तिने म्हटले की पूर्ण संघ फिटनेसवर आणि कौशलावर काम करत राहिला आहे. आम्हांला सतत सामने खेळण्यासाठी लयला मिळवावे लागेल. आम्ही मागील पाच, सहा महिन्या पासून सतत क्रिकेट खेळले आहे आणि आता आम्ही परत एकदा सामना खेळण्याच्या मानसिकतेमध्ये परतत आहोत.