गणेश मंडळांनी रक्तदान शिबिरे घ्यावीत : पो. नि. अनिरुद्ध नांदेडकर
जालना,
रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रोटरी क्लब ऑफ जालना मिडटाउन ने पुढाकार घेतला असून सार्वजनिक गणेश मंडळांनी रोटरी च्या सहकार्याने रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे. असे आवाहन सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांनी आज केले.
या संदर्भात मंगळवारी
( ता. चौदा) अधिक माहिती देताना पो. नि. अनिरुद्ध नांदेडकर म्हणाले की, कोरोना संसर्गाच्या सावटाखाली गत वषार्ंपासून होत असलेला असलेल्या गणेशोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांवर मर्यादा असल्या तरी सामाजिक जाणिवेतून रोटरी क्लब ऑफ जालना मिड टाउन चे अध्यक्ष रो. महेश धन्नावत, सचिव रो.प्रशांत बागडी, प्रकल्प प्रमुख प्रणय अग्रवाल व रोमित भक्कड व सदस्यांनी जिल्हा पोलिस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने रक्तदानाचा महा संकल्प केला आहे. असे सांगून पो. नि.अनिरुद्ध नांदेडकर म्हणाले ,जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी निरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार दिवसांपासून शांततेत उत्सव सुरू आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी नियमांचे पालन करत रक्तदान शिबीरे आयोजित करावी आणि रक्त संकलनाच्या मोहिमेत सहभागी होण्यासाठी सचिव रो. प्रशांत बागडी यांच्या शी 9823380090 संपर्क साधावा. असे आवाहन पो. नि.अनिरुद्ध नांदेडकर यांनी केले.