आरोग्य आणि उर्जा कार्य व्यासपीठावरून जागतिक आरोग्य संघटनेच्या उच्चस्तरीय आघाडीला डॉ हर्षवर्धन यांनी केले संबोधित. कमी कार्बन उत्सर्जन आणि समावेशक विकासासाठीच्या आर्थिक विकासाच्या नव्या मॉडेलचे नेतृत्व करण्यासाठी भारत योग्य स्थितीत असल्याचे त्यांनी केले अधोरेखित. “भारताचा मानव-केंद्री दृष्टिकोण जगाच्या कल्याणासाठीच प्रबळ प्रेरणा ठरेल”: डॉ. हर्षवर्धन
नवी दिल्ली, 10 जून 2021
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी काल रात्री जागतिक आरोग्य संघटनेच्या आरोग्य आणि उर्जा कार्य व्यासपीठावर उच्चस्तरीय आघाडीच्या पहिल्या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित केले. बैठकीत अनेक मान्यवर व्यक्ती, राष्ट्र प्रमुख आणि जागतिक बँक, यूएनडीपी, यूएनएचआरसी, अंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा संस्था (आईआरईएनए) यासह संबंधित अनेक घटकांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला.
त्यांचे संबोधन खाली दिले आहे:
जग अजूनही कोविड-19 च्या अभूतपूर्व संकटाचा सामना करत आहे. माणसांचे जीव वाचवणे आणि जगभरात रुग्णसंख्या कमी करणे यासाठी असामान्य पावले उचलण्यासाठी सरकार आणि नागरीक यांना प्रेरीत केले आहे. महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांनी विविध क्षेत्रांमधे परस्पर अवलंबित्वाचे दर्शन झाले. प्रभावी आणि सातत्यपूर्ण सेवा वितरणासाठी सर्वच क्षेत्रातील परस्पर संबंध आपल्या धोरणांमध्ये लक्षात घेण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
हवामान बदलाचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम याबाबबत सर्वसामान्य जनता, आरोग्य देखभाली संदर्भात सेवा पुरवणारे आणि धोरणकर्त्यांमधे जागृकता निर्माण करण्याच्या उद्देशासह, हवामान बदल आणि मानवी आरोग्य यावर राष्ट्रीयकृती योजना नामक एक तज्ञांचा विभाग आमच्या सरकारने स्थापन केला होता. या राष्ट्रीय तज्ञ समूहाने नुकतेच एप्रिल 2021 मधे हवामान बदलाशी संबंधित संवेदनशील आजार आणि एक आरोग्य याबाबत विशेष आरोग्य कार्य योजनेस सहभागी करत आपला अहवाल सादर केला.
“हरित आणि हवामान बदलाशी संबंधित आरोग्य देखभाल सुविधां” संदर्भात, भारताने 2017 मधे माले करारावर हस्ताक्षर केले आणि कोणत्याही हवामान बदलाशी संबंधित आपत्तीचा सामना करण्यासाठी सक्षम होण्याकरता हवामान बदलाशी संबंधित आरोग्य सुविधांना प्रोत्साहन देण्यासाठी सहमती दर्शवली. भारत आज कमी कार्बन उत्सर्जन और समावेशक विकासा संबंधित आर्थिक विकासाच्या नवीन मॉडेलचे नेतृत्व करण्याच्या योग्य स्थितीत आहे. यात वैश्विक आरोग्य विषयक सेवाही अध्याहृत आहे.
आरोग्य आणि उर्जा क्षेत्राची क्षमता वाढवण्यासाठी संसाधन उपलब्ध करण्याकरता दृढ राजकीय आणि आर्थिक वचनबद्धता ही काळाची गरज आहे. जगभरातील देश कोविड-19 पश्चात काळासाठी तयारी करत आहेत. वैश्विक पुनर्व्यवस्थेसाठी ही मोठी संधी आहे. देशांना, महत्वाकांक्षी हरित प्रोत्साहन योजना, आपल्या ऊर्जा परिवर्तानास गहीरे करत आपल्या अर्थव्यवस्थेला चालना द्यायला मदत करतील. मला विश्वास आहे, या आघाडी समूहाच्या सहकार्य आणि सामूहीक कार्याने एक अधिक हरित आणि आरोग्यदायी ग्रह प्राप्त करण्यात मदत होईल.