उत्तर प्रदेशमध्ये दोन बहिणींवर सामूहिक बलात्कार, तिघांना अटक
इटावा
इटावा जिल्ह्यातील एका महिला ठाण्यातून माघारी येत असलेल्या दोन बहिणींचे कथीतपणे तीन लोकांनी अपहरण केले आणि त्यांच्यावर सामुहिक बलात्कार केला. रविवारी घडलेल्या या घटनेत सामिल तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
पीडित दोन बहिणीनी तीन आरोपींच्या विरोधात इटावा जिल्ह्यातील सैफई ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सैफाई ठाण्याचे प्रभारी हामिद सिद्दीकीनी म्हटले की आमची टिम एका रेल्वे ओव्हर बि-जच्या खालून गस्त करत होती त्याचवेळी आम्ही तीन लोकांना पाहिले जे पोलिस व्हॅनला पाहून पळून जाउ लागले. आम्ही नशेच्या स्थितीमध्ये या तिघांनाही अटक केली.
पोलिस अधिकार्याने सांगितले की ज्यावेळी त्यांनी तिनीही लोकांना अटक केली तर आम्हांला जवळच्या एका बंद दुकानातून आराडा ओरडा ऐकू आला. दुकानामध्ये प्रवेश केल्यानंतर आम्ही दोन महिलांना रडताना पाहिले आणि त्या अर्धनग्न अवस्थेमध्ये होत्या. त्यांची आपबीती बाबत जाणून घेतल्यानंतर आम्ही त्यांना वैद्यकिय तपासणीसाठी इटावा जिल्हा रुग्णालयात नेले.
दोनीही महिलांनी आरोप केला की ज्या व्यक्तीने त्यांना लिफ्ट दिली होती आणि त्यांच्या सहकार्यानी त्यांना दारु पिण्यासाठी मजबूर केले. त्यांनी बहिणीना मदतीसाठी कोणलाही बोलावण्याचा प्रयत्न केल्यास गंभीर परिणाम भोगण्याची चेतावनी दिली. युवक बहिणींना दुकानातू घेऊन गेला आणि त्यांच्यावर बलात्कार केला. एका तक्रारीकर्तीनुसार बहिणीना आरोपीनी क्रूरपणे मारहाण केली.