न्यायालयीन पर्याय शिल्लक असेपर्यंत अनिल देशमुख ईडीसमोर हजर होणार नाहीत – राष्ट्रवादी प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील
नागपूर,
भ-ष्टाचाराच्या आरोपांमुळे पद गमवावे लागलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख कुठे आहेत? याचा शोध ईडीकडून घेतला जात आहे. मात्र, अनेकवेळा नोटीस बजावून देखील ते ईडीसमोर हजर झालेले नाहीत. त्यांचा ठावठिकाणा अजून ईडीला सापडलेला नाही. या पार्श्वभूमीवर देशमुख यांचा शोध घेण्यासाठी ईडीने सीबीआयकडे मदत मागितली आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते आणि प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ईडीने सीबीआयकडे मदत मागणे हे हास्यास्पद आहे. न्यायालयीन पर्याय शिल्लक असेपर्यंत माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडीसमोर हजर होणार नाहीत, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे यांनी दिली आहे.
शंभर कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप झाल्यानंतर ते सार्वजनिकरित्या कुठेही दिसून आले नाहीत. तपासाकरिता अनेकवेळा ईडीच्या पथकांनी त्यांच्या नागपूर, काटोल आणि मुंबई येथील निवासस्थानी धाडी टाकल्या, मात्र ठोस असं काहीही त्यांच्या हाती लागलेलं नसल्याचं कुंटे म्हणाले आहेत.
अनिल देशमुख महाराष्ट्रात आहेत की महाराष्ट्राबाहेर? यासंदर्भात आमच्याकडे कुठलीही माहिती नसल्याचं प्रवीण कुंटे पाटील यांनी स्पष्ट केले. मात्र, ते भारतातच असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. योग्य वेळी ते ईडीसमोर येतील असे देखील त्यांनी सांगितले आहे.
अनिल देशमुख यांच्यासोबत गेल्या दोन-तीन महिन्यांपासून कुठल्याही पद्धतीचा संपर्क झाला नसल्याची माहिती प्रवीण कुंटे पाटील यांनी दिली आहे. मात्र, ते निश्चितपणे भारतातच असल्याच्या दाव्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
बाळासाहेब थोरात यांची राजकीय उंची काढण्याची वेळ राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आली आहे. मोदीविरोधी आघाडी तयार करायची असेल तर सर्व विरोधी पक्षांची मूठ बांधण्याची गरज आहे. त्याकरिता राष्ट्रवादी पक्ष हा काँग-ेसमध्ये विलीन करावा असं वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केले होते. त्यानंतर काही दिवसांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग-ेसच्या परिस्थितीचे सटीक विेषण केले होते, ते काँग-ेसच्या नेत्यांनी मनावर घेतले असल्याचा चिमटा देखील कुंटे यांनी थोरातांना काढला आहे.