महिन्याभराच्या निच्चांकी स्तरावर सोने दर, चांदीही स्वस्त

नवी दिल्ली,

कमकुवत जागतिक संकेतांचा परिणाम सोने आणि चांदीच्या किमतीवर पाहायला मिळाला आहे. र्श्ण्ें वर सोन्याचा भाव आज 0.14 टक्क्यांच्या वाढीसह 46,872 रुपये प्रति 10 ग-ॅमवर ट्रेड करत आहे. यावेळी हा भाव मागील एक महिन्याच्या निच्चांकी स्तरावर ट्रेड करत आहे. तर चांदीच्या दरात आज घसरण झाली आहे. चांदी 0.4 टक्क्यांच्या घसरणीसह 63,345 रुपये प्रति किलोग-ॅम आहे. मागील सत्रात सोने दरात 0.4 टक्क्यांची घसरण झाली होती. तर चांदीच्या दरात 0.9 टक्के घसरण झाली होती.

सोन्याचे दर सर्व शहरात वेगवेगळे असतात. देशाची राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 50340 रुपये प्रति 10 ग-ॅम आहे. त्याशिवाय चेन्नईत 48390 रुपये, मुंबईत 47070 रुपये आणि कोलकातामध्ये 49140 रुपये प्रति 10 ग-ॅम आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!