फिट इंडिया प्रश्नमंजुषेसाठी 2 लाख शालेय विद्यार्थ्यांच्या मोफत नोंदणीची क्रीडा मंत्रालयाची घोषणा

नवी दिल्ली 14 SEP 2021

ठळक मुद्दे

शालेय विद्यार्थ्यांसाठी फिटनेस अर्थात तंदुरुस्ती आणि खेळांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी क्रीडा आणि तंदुरुस्तीवर प्रथमच देशव्यापी प्रश्नमंजुषा, फिट इंडिया प्रश्नमंजुषा 1 सप्टेंबर रोजी सुरू करण्यात आली.

शालेय मुलांसाठी क्रीडा आणि तंदुरुस्तीवर प्रथमच देशव्यापी प्रश्नमंजुषा, फिट इंडिया प्रश्नमंजुषा सहभागींसाठी आणखी आकर्षक बनवण्यात आली आहे. भारतभरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक प्रमुख उपहार म्हणून, युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाने घोषित केले आहे की 1 लाख शाळांनी नामांकित केलेले पहिले 2 लाख विद्यार्थी आता 225 रुपयांच्या पूर्वी लागू असलेल्या सहभाग शुल्काऐवजी देशव्यापी भारत प्रश्नमंजुषेसाठी मोफत नोंदणी करू शकतात. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्वावर प्रत्येक शाळा प्रश्नमंजुषेसाठी जास्तीत जास्त 2 विद्यार्थ्यांना विनामूल्य नामांकित करू शकते.

मुलांमध्ये तंदुरुस्ती आणि खेळांविषयी जागरूकता वाढवण्यासाठी हा निर्णय केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री श्री. अनुराग सिंह ठाकूर यांनी जाहीर केला. “तंदुरुस्त जीवन जगण्याच्या महत्त्वाबद्दल मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनातील फिट इंडिया चळवळीचा एक भाग म्हणून फिट इंडिया प्रश्नमंजुषा सुरू करण्यात आली आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांना फिट इंडिया प्रश्नमंजूषेत सामील होण्यास प्रेरित करण्यासाठी, पहिल्या 1 लाख शाळांमधील 2 लाख विद्यार्थ्यांचे 225 रुपयांचे सहभाग शुल्क माफ करण्यात आले आहे,” असे ठाकूर यांनी सांगितले. तसेच नंतरच्या प्रत्येक अतिरिक्त विद्यार्थ्याला शाळा 225 रुपयांच्या पूर्वीच्या शुल्काऐवजी 50 रुपयांच्या नाममात्र शुल्कासह नामांकित करू शकते.

क्रीडा आणि तंदुरुस्ती या विषयावर प्रथमच देशव्यापी, फिट इंडिया प्रश्नमंजुषा 1 सप्टेंबर रोजी केंद्रीय शिक्षण मंत्री  धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत ठाकूर यांनी सुरू केली. देशव्यापी प्रश्नमंजूषेच्या अंतिम फेरीचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर होणार असून विजेत्यांसाठी  तब्बल 3.25 कोटी रुपये इतक्या   रक्कमेचे  बक्षीस ठेवले आहेत .

प्रश्नमंजुषेत देशातील प्रत्येक राज्य/केंद्रशासित प्रदेशातून प्रतिनिधित्व असेल आणि त्याचे स्वरूप ऑनलाइन आणि प्रसारण फेऱ्या असे संमिश्र असेल. हे स्वरूप सर्वसमावेशक पद्धतीने तयार केले गेले आहे, ज्यामध्ये देशभरातील शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या साथीदारांसह  त्यांच्या तंदुरुस्ती आणि क्रीडाविषयक ज्ञानाची चाचणी घेण्याची संधी मिळेल.

फिट इंडिया प्रश्नमंजूषेत सहभागी होण्याचे तपशील फिट इंडिया संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!