आम आदमी पक्षाला ईडी ची नोटीस; बोगस कंपन्यांकडून निधी घेतल्याने कारवाई
नवी दिल्ली
अंमलबजावणी संचालनालय ने आम आदमी पक्षाला नोटीस पाठवली आहे. आम आदमी पक्षाने फेब-ुवारी 2014 मध्ये 4 बनावट बोगस कंपन्यांच्या माध्यमातून निधी घेतल्याचे हे प्रकरण आहे. त्यावेळी 4 बनावट कंपन्यांकडून आम आदमी पक्षाला 2 कोटी रुपये मिळाल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली होती. हा पैसा देहरादूनच्या एका कंपनीने शैल कंपन्यांच्या माध्यमातून दिला होता.
ईडीच्या नोटीसी नंतर आम आदमी पार्टीचे आमदार राघव चड्डाने टवीट करून माहिती दिली की, मोदी सरकारची फेवरेट एजेंसी ईडीने आम आदमी पक्षाला लव लेटर पाठवले आहे. मी आम आदमी पार्टीच्या मुख्यालयात दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी प्रेस कॉन्फरन्स करणार आहे. तसेच भाजपच्या सुडाच्या कारवाईबाबत देखील बोलणार आहे.
ईडीने 2017 साली या चार बनावट कंपन्यांविरोधात प्रिवेंशन ऑॅफ मनी लाँड्रिंग ऍक्ट (झचङअ)अंतर्गत केस दाखल केली होती. या चार बनावट कंपन्यांच्या माध्यमातून 2014 मध्ये 50-50 लाख रुपयांचे चार चेक आम आदमी पार्टीच्या नावावर वटवण्यात आले होते. दिल्ली पोलिसांनी 21 ऑॅगस्ट 2020 रोजी आम आदमी पार्टीला बनावट कंपन्यांच्या माध्यमातून 2 कोटी रुपये निधी ट्रान्सफर करण्याच्या आरोपात मुकेस कुमार आणि सुधांशु बन्सलला अटक करण्यात आली होती