माजी केंद्रीय मंत्री आणि काँग-ेसचे वरिष्ठ नेते ऑॅस्कर फर्नांडिस यांचं निधन
बंगळुरू,
माजी केंद्रीय मंत्री आणि काँग-ेसचे वरिष्ठ नेता ऑॅस्कर फर्नांडिस यांचं निधन झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. कर्नाटकमधील मंगळुरूमध्ये ऑॅस्कर फर्नांडिस यांनी शेवटचा श्वास घेतला. रुग्णालयाकडून या वृत्ताची पुष्टी करण्यात आली आहे.
80 वर्षांचे ऑॅस्कर फर्नांडिस बर्याच काळापासून आजारी होते. आणि काही आठवड्यांपूर्वी त्यांना मंगळुरू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या वर्षीय योग करीत असताना त्यांना जखमही झाली होती. यानंतर त्यांनी तब्येत अधिक बिघडली.
ऑॅस्कर फर्नांडिस काँग-ेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयं होतं. ते यूपीए सरकारमध्ये रस्ते परिवहन मंत्री राहिले होते. आता देखील ते राज्यसभामध्ये खासदार होते.
1980 मध्ये कर्नाटकातील उडप्पी लोकसभा जागेवरुन ते खासदार म्हणून निवडून आले होते. यानंतर 1996 पर्यंत ते सातत्याने निवडून आले होते. 1998 मध्ये काँग-ेसने त्यांना राज्यसभेत पाठवलं होतं. तेव्हापासून ते राज्यसभा खासदार असताना संसदेचे सदस्य म्हणून राहिले होते.