धामोडी येथील गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम..

धामोडी प्रतिनिधी – ( राहुल जैन )

धामोडी येथील जय हो गणेश मंडळ यांनी एक आदर्श उपक्रम राबविला वाढते संसर्गजन्य रोग लक्षात घेता डास प्रतिबंधक औषध फवारणी ही धामोडी गावामध्ये जय हो गणेश मंडळाने स्वखर्चाने केली. त्याबद्दल मंडळाचे कौतुक केले जात आहे. परिसरातील इतर गावामध्ये अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम गणेश मंडळांनी राबवावे, अशे आवाहन या गणेश मंडळाने केले आहे.

गेल्या वर्षी कोरोना काळ असल्यामुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा केला होता पण यंदा थोडी सुट मिळाल्याने कोरोनाचे सर्व नियम पाळत गणरायाचे आगमन झाले. समाजउपयोगी उपक्रमांचा वसा या मंडळाने स्वीकारलेला असून पुढेही अशा प्रकारचे उपक्रम मंडळाकडून राबविण्यात येतील अशे त्यांनी सांगितले त्यावेळी श्री. दुर्गादास (बंडू)पाटील.(ग्रामपंचायत सदस्य धामोडी), सात्विक (सौरभ) भाऊ पाटील. (तालुका सरचिटणीस राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टी रावेर. तथा अध्यक्ष जय हो गणेशा मित्र मंडळ धामोडी.) भुषण भाऊ महाजन (सदस्य ओ.बी.सी.सेल तथा उपाध्यक्ष जय हो गणेशा मित्र मंडळ धामोडी).आकाश भाऊ महाजन.चेतन पाटील. दिपेश पाटील. संचित पाटील. कार्तिक पाटील. पवन पाटील. अभिषेक महाजन. विठ्ठल महाजन. पृथ्वीराज पाटील. मनिष पाटील. हितेश कोळी.इ उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!