नीट परीक्षा: भारताच्या 202 शहरात 15 लाखपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची परीक्षा
दिल्ली
नीट यूजी 2021 परीक्षा भारताच्या 202 शहरात 3,800 पेक्षा जास्त परीक्षा केंद्रामध्ये आज (रविवार) 12 सप्टेंबरला दुपारी 2 वाजेपासून सायंकाळी 5 वाजेदरम्यान आयोजित केली जात आहे. पूर्ण देशात 15 लाख 30 हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी परीक्षेत समाविष्ट होण्यासाठी अर्ज केला आहे. ऑफलाइन मोडमध्ये होणार्या या परीक्षेचे आयोजन नॅशनल टेस्टिंग संस्थेद्वारे (एनटीए) केले जात आहे. एनटीएनुसार शिक्षण मंत्रालयाच्या पहलवर मेडिकल प्रवेश परीक्षा ’नीट-यूजी’ पहिल्यांदा दुबईमध्ये आयोजित केले जाईल. दुबई स्थित परीक्षा केंद्राच्या व्यतिरिक्त कुवैतमध्येही नीट-यूजी परीक्षा आयोजित केली जात आहे.
सामाजिक अंतराच्या मानदंडाला निश्चित करण्यासाठी ज्या शहरात परीक्षा आयोजित केली जाईल, त्यांची संख्या 155 ने वाढून 202 केली आहे. परीक्षा केंद्राची संख्या देखील 2020 मध्ये उपयोग केलेल्या केंद्राच्या तुलनेत वाढवली जात आहे.
केंद्र सरकारने यावेळी नीट परीक्षेत 27 टक्के ओबीसी आरक्षणाला लागु करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच विद्यार्थ्यांना 13 भाषेत ही परीक्षा देण्याची सुविधा प्रदान केली आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या पहलवर आणि नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या तरतुदी अंतर्गत यावेळी विद्यार्थ्यांना या 13 भाषेत ही परीक्षा देण्याची सुविधा प्रदान केली आहे. यात बहुतांश भारतीय भाषा आहे.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की देशभरात कोविड-19 प्रोटोकॉलचे पालन करताना नीट (यूजी) 2021 परीक्षा आयोजित केली जाईल. केंद्रीय शिक्षण मंत्रालयानुसार नीट परीक्षा केंद्रात कोरोना रोखचे सर्व उपाय केले जात आहे.
नॅशनल टेस्टिंग संस्थेचे (एनटीए) म्हणणे आहे की मेडिकल प्रवेश परीक्षा नीट 2021 साठी विद्यार्थ्यांच्या मानंकनाच्या आधारावर परीक्षा केंद्रावाले शहराची व्यवस्था केली गेली आहे. उमेदवाराद्वारे दिलेल्या प्राथमिकतेच्या ्आधारावर बहुतांश शहर व परीक्षा केंद्र वाटप केले गेले. नीट परीक्षा शहरात भारतााचे ते सर्व शहर समाविष्ट आहे ज्यात मेडिकल प्रवेश परीक्षा आयोजित केले जाईल.
नीट परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी देशाचे विभिन्न प्रतिष्ठित मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस, बीएएमएस, बीएसएमएस, बीयूएमएस आणि बीएचएमएससहित विभिन्न कोर्सेजमध्ये प्रवेश घेऊ शकतील.
राष्ट्रीय वैद्यकीय आयोग कायदा, 2019 मध्ये दुरूस्तीच्या उपरांत देशभरात स्थित 13 एम्स आणि पाँडेचेरीचे जवाहरलाल पीजी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्थेचे एमबीबीएस पाठ्यक्रमाची प्रवेश परीक्षा देखील नीटद्वारे घेतली जात आहे.