विदेशातील संपत्तीला गोठवल्याची कोणतीही औपचारिक अधिसूचना नाही – अफगाण केंद्रिय बँक
काबुल,
विदेशातील अफगाणिनी संपत्तीला गोठविल्याच्या (फ्रिज) संबंधीची अजून पर्यंत कोणतीही औपचारिक अधिसूचना प्राप्त झाली नसल्याची घोषणा अफगाणिस्तानची केंद्रिय बँक द अफगाणिस्तान बँक (डीबीए) ने रविवारी केली.
बँकेने आपल्या वेबसाईटवर पोस्ट केलेल्या एका निवेदनात म्हटले की द अफगाणिस्तान बँकेला मौद्रिक भंडाराला फ्रिज केल्याशी संबंधी कोणतीही औपचारिक अधिसूचना आता पर्यंत मिळालेली नाही आणि बँकेला विदेशी मीडियातील बातमीच्या आधारावर देशातील मीडियाने प्रकाशित केलेल्या बातम्यांच्या माध्यमातून माहिती दिली गेली आहे.
ऑगस्टच्या मध्यामध्ये तालिबानने अफगाणिस्तानवर पूर्णपणे ताबा मिळविल्यानंतर देशातील नागरीकांनी बँकेतून आपल्या बचतीला काढून घेण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. याच कालावधीत अफगाणिस्तानच्या विदेशातील संपत्तीला गोठविण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.
अमेरिकेने अफगाणिस्तानच्या बँक संपत्तीना फ्रिज केल्याच्या बातम्या बरोबरच जागतीक बँक आणि आंतरराष्ट्रीय मुद्रा कोष (आयएमएफ) द्वारा फंड रोकले जाण्याच्या घोषणेने अफगाणिस्तानच्या चिंता अजूनच वाढल्या आहेत.
28 ऑगस्टला डीबीएने युध्दग-स्त देशातील सर्व बँकांना एका ग-ाहकासाठी 200 डॉलर किंवा 20 हजार अफगाणि रुपये काढण्याची साप्ताहिक मर्यादा निर्धारीत करण्याचे आदेश प्रसिध्द केले.
डीबीएने रविवारी प्रसिध्द केलेल्या निवेदनात म्हटले की द अफगाणिस्तान बँक अफगाणिस्तानच्या लोेकांना वाणिज्यीक बँकांमध्ये जमा रक्कमेच्या सुरक्षेचे आश्वासन देत आहे. या बँका प्रसिध्द केलेल्या प्रक्रियेनुसार काम करत आहेत आणि त्यांची सेवा लवकरच सामान्य होईल.